स्वातंत्र्य दिन, जन्माष्टमीनिमित्त मथुरेत कडक सुरक्षा व्यवस्था

पीटीआय
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

महत्त्वाच्या धार्मिकस्थळांजवळ शीघ्र कृतिदल तैनात करण्यात आले आहे. पोलिस मुख्यालयातून नऊ तुकड्या रवाना करण्यात आल्या असून त्यातील सहा तुकड्या या आगाऊ सुरक्षा तपासणीसाठी असतील तर तीन तुकड्या या बॉंबनाशक पथकात असतील

मथुरा - स्वातंत्र्य दिन आणि जन्माष्टमी शांततेत साजरी होण्यासाठी मथुरेत कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आज सूत्रांनी दिली. शहरात जवळपास अडीच हजार "पोलिस मित्र' नेमण्यात आले असून त्यात चहा विक्रेते, पथारीवाले आणि भाजीविक्रेते यांचा समावेश असून ते पोलिसांबरोबर काम करणार आहेत, असे वरिष्ठ पोलिस अधीक्षक स्वप्नील मामगाई यांनी सांगितले.

सामुदायिक पोलिस व्यवस्थेत गुंतलेल्या नागरिकांना प्रशासनाकडून ओळखपत्र दिले जाईल, ही व्यवस्था जन्माष्टमीनंतरही कायम राहील.

महत्त्वाच्या धार्मिकस्थळांजवळ शीघ्र कृतिदल तैनात करण्यात आले आहे. पोलिस मुख्यालयातून नऊ तुकड्या रवाना करण्यात आल्या असून त्यातील सहा तुकड्या या आगाऊ सुरक्षा तपासणीसाठी असतील तर तीन तुकड्या या बॉंबनाशक पथकात असतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

श्रीकृष्ण जन्मस्थानाजवळ दोन श्‍वान पथके तैनात करण्यात येणार असून तिसरे पथक हे वृंदावन, मामगाई येथे तैनात करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे पोलिस नियमितपणे वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचे काम करतील, असे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

Web Title: securiy in mathura