पाकिस्तानच्या समर्थनार्थ ताजमहालात घोषणाबाजी (व्हिडिओ)

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

आग्रा - शाहजानच्या ऊरुसानिमित्त ताज महालमध्ये प्रवेश शुल्क आकारण्यात येत नव्हते. त्यामुळे येथे नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. यावेळी दुपारी साडेतीनच्या सुमारास चादर अर्पण करण्यासाठी काही तरुण आले. ढोलाच्या गजरात घोषणाबाजी करीत ते आत आले. यावेळी एका तरुणाने पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केली.

जनसत्ताने दिलेल्या माहितीनुसार,  तरुणाच्या या घोषणाबाजीनंतर सुरक्षा रक्षकांची चांगलीच धांदल उडाली. तर हा सगळा प्रकार तिथल्या एका तरुणाच्या मोबाईलमध्ये कैद झाला असून, हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

हा वाद पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजीपर्यंतच मर्यादित राहिला नाही तर नियमांचे उल्लंघन करीत एक जण भारताचा राष्ट्रध्वज मुमताजच्या कबरीपर्यंत घेऊन गेला आणि त्याने तिथे तिरंग्यासोबत फोटो काढत घोषणाबाजी केली.

दरम्यान, या प्रकाराबाबत प्रतिक्रिया देताना ऊरुस समितीचे संचालक सैय्यद मुनव्वर अली यांनी सांगितले की, त्यांनीही हा वादग्रस्त व्हिडिओ पाहिला आहे. ज्या तरुणाने अशा प्रकारे पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली त्याच्या विरोधी देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात येणार आहे. 

Web Title: Sedition charge invoked against unknown youth for raising Pakistan Zindabad inside Taj Mahal