कोरोनाचा विस्फोट; पहा भारतातील स्थिती ग्राफिक्सच्या माध्यमातून

पीटीआय
Wednesday, 16 September 2020

भारतातील रुग्णसंख्येने मंगळवारी रात्री ५० लाख रुग्णसंख्येचा आकडा पार केला.  यापैकी ९,९३,०७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून त्याखालोखाल आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशचा क्रमांक आहे. गेल्या काही दिवसांत दररोज किमान ८० ते ९० हजार रुग्णांची भर पडत होती. असे असले तरी भारताचा रिकव्हरी रेट सर्वांत जास्त म्हणजे ७८.२८ टक्के असल्याचा सरकारचा दावा आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यात शहरीकरणामुळे वाढला संसर्ग 
वेगाने झालेल्या शहरीकरणाबरोबरच सर्वोत्कृष्ट सर्वेक्षण यंत्रणा आणि रोगनिदान व्यवस्था यामुळे राज्यातील प्रत्येक कोरोनाबाधित रुग्णाची नोंद होते. यातून संख्या वाढताना दिसत असली तरीही तो रुग्ण उपचारांखाली येतो. त्यामुळे त्याच्यापासून होणारा संसर्ग तेथेच रोखण्यात यश येत आहे. 

Image may contain: one or more people, text that says "भारतात कोरोना संसर्गाचा प्रसार तारीख १५ सप्टेंबर ५ सप्टेंबर २३ ऑगस्ट ऑगस्ट १६जुले १९मे १ लाख ३० जानेवारी १ ५० लाख ४० लाख ३० लाख २० लाख १० लाख रुग्ण संख्या देशातील रुग्णसंख्या 50,09,290 देशातील मृत्यू 82,045"

डिजिटल भारतात 80 टक्के विद्यार्थी मुकले शिक्षणाला 

देशात सर्वाधिक रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहेत. देशात सर्वाधिक रुग्णांची नोंद महाराष्ट्रातच का झाली, या प्रश्नाचे उत्तर देताना राज्याच्या आरोग्य खात्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, महाराष्ट्र हे वेगानं शहरीकरण झालेले राज्य आहे. त्यामुळे कोरोनाचा उद्रेक महाराष्ट्रात वाढल्याचे दिसते. राज्यातील ५२ टक्के रुग्ण मुंबई, ठाणे आणि पुणे या तीन शहरांमध्ये आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी असल्याने आंतरराष्ट्रीय संपर्क येतो. त्यामुळे त्यातून कोरोनाचा फैलाव होण्याची शक्‍यता अधिक असते.  
विकसित राज्य असल्याने खूप मोठ्या प्रमाणावर स्थलांतरीत मजूर येतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वेगाने होतोच पण, तो बराच काळ टिकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

देशातील या सहा कंपन्यांची विक्री होणार; अनुराग ठाकूर यांनी दिले संकेत

Edited By - Prashant Patil

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: See Corona Blast through status graphics in India