यूट्यूब पाहून केला स्वतःच्या प्रसूतीचा प्रयत्न; बाळ-बाळंतिणीचा मृत्यू 

पीटीआय
बुधवार, 13 मार्च 2019

गोरखपूर (वृत्तसंस्था) : अविवाहित गर्भवती महिलेने यूट्यूबवर प्रसूतीचा व्हिडोओ पाहत स्वतःच बाळाचा जन्म देण्याचा प्रयत्न केला. यात बाळ व बाळंतिणीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी (ता. 11) दिली.
 

गोरखपूर (वृत्तसंस्था) : अविवाहित गर्भवती महिलेने यूट्यूबवर प्रसूतीचा व्हिडोओ पाहत स्वतःच बाळाचा जन्म देण्याचा प्रयत्न केला. यात बाळ व बाळंतिणीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी (ता. 11) दिली.
 
बिलन्दपूर शहरात रविवारी (ता. 10) ही घटना घडली. अविवाहित मातांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन लक्षात घेऊन त्या भीतीने संबंधित महिलेने स्वतःच स्वतःची प्रसूती करण्याचा निर्णय घेतला असावा, अशी शक्‍यता कॅन्टोन्मेंट पोलिस स्थानकाचे प्रमुख रवी राय यांनी व्यक्त केली. खोलीतून रक्त बाहेर येत असल्याचे पाहून महिलेच्या शेजाऱ्यांनी घरमालक रवी उपाध्याय यांना याबाबत कळविले. त्यांनी दरवाजा तोडला असता, महिला व नुकतेच जन्मलेले बाळ मृतावस्थेत आढळले. तेथे पडलेला स्मार्टफोन तपासला असता "स्वतःच स्वचःच्या बाळाला जन्म कसा द्यायचा' हा व सुरक्षित प्रसूतीविषयीचा व्हिडिओ ती यूट्यूबवर पाहत होती. ते पाहूनच तिने स्वतःची प्रसूती केली आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला. तसेच नवजात शिशूचाही मृत्यू झाल्याचे राय यांनी सांगितले. महिलेच्या मृतदेहाजवळ कात्री, ब्लेड व दोराही सापडला. शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेबद्दल तक्रार नोंदविण्यास त्यांनी नकार दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seeing youtube and tried to deliver itself mother and baby die