किफायतशीर शेतीवर आजपासून चर्चासत्र

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 जून 2018

शेतकऱ्यांचे उत्पन्न सन 2022 पर्यंत दुप्पट करण्यासंदर्भात सुरू असलेल्या राष्ट्रीय चर्चेच्या मालिकेत उद्यापासून (21 जून) पुण्यात दोन दिवसांचे चर्चासत्र होणार असून, त्याचे उद्‌घाटन उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू करणार आहेत. तर या परिषदेत माजी कृषिमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कृषितज्ज्ञ व आंध्र प्रदेशचे माजी कृषिमंत्री व्ही. सोभनाद्रिश्‍वर राव आणि अनेक कृषी व अर्थतज्ज्ञ, कृषिसंशोधक सहभागी होणार आहेत.

नवी दिल्ली - शेतकऱ्यांचे उत्पन्न सन 2022 पर्यंत दुप्पट करण्यासंदर्भात सुरू असलेल्या राष्ट्रीय चर्चेच्या मालिकेत उद्यापासून (21 जून) पुण्यात दोन दिवसांचे चर्चासत्र होणार असून, त्याचे उद्‌घाटन उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू करणार आहेत. तर या परिषदेत माजी कृषिमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कृषितज्ज्ञ व आंध्र प्रदेशचे माजी कृषिमंत्री व्ही. सोभनाद्रिश्‍वर राव आणि अनेक कृषी व अर्थतज्ज्ञ, कृषिसंशोधक सहभागी होणार आहेत. 

"टिकाऊ व किफायतशीर शेती' ही या चर्चासत्राची मध्यवर्ती कल्पना आहे. या चर्चासत्रात केवळ तज्ज्ञच नव्हे तर शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, उद्योगांच्या प्रातिनिधिक संस्था, सीआयआय व फिक्की यांचेही प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. पुण्यातील "इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन' (आयआयपीए) आणि वैकुंठभाई मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट यांच्या पुढाकाराने ही परिषद होत आहे. उपराष्ट्रपती हे आयआयपीए या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. 

Web Title: seminar on farming