धक्कादायक! 'एअर इंडिया'च्या पायलटने चोरले पाकीट?

धक्कादायक! 'एअर इंडिया'च्या पायलटने चोरले पाकीट?

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या एका पायलटने ऑस्ट्रेलियातील सिडनी विमानतळावर असलेल्या एका स्टोअरमधून पाकीट चोरल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एअर इंडियाने संबंधित पायलटला निलंबित करीत चौकशीचे आदेश दिले आहेत.

रोहित भसिन हे एअर इंडियाचे वरिष्ठ पायलट असून, पूर्व विभागाच्या संचालकपदाची जबाबदारीही त्यांच्याकडे आहे. 22 जून रोजी सिडनीवरून दिल्लीला आलेले विमान त्यांनी स्वतः ऑपरेट केले. तत्पूर्वी ते विमानतळावरील एका स्टोअरमध्ये खरेदीसाठी गेले होते. तेथे त्यांनी पाकीट चोरल्याची तक्रार सिडनी विमानतळावरील विभागीय व्यवस्थापकाने केल्यानंतर एअर इंडियाने भसिन यांना निलंबित करीत चौकशीचे आदेश दिले आहेत.

भसिन यांना पूर्वपरवानशिवाय एअर इंडियाच्या कार्यालयात प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला असून, ओळखपत्र जमा करण्याबरोबर कोलकाता स्टेशन न सोडण्याचे निर्देशही एअर इंडियाने त्यांना दिले आहेत. 

म्हणून घडला हा प्रकार ! 

भसिन दिल्लीकडे येत असताना ते आजोबा झाल्याची माहिती त्यांना मिळाली होती. सुनेला काही तरी भेट द्यावी, या हेतूने ते खरेदीसाठी संबंधित स्टोअरमध्ये गेले. मात्र, फ्लाइटची वेळ झाल्याचे लक्षात येताच ते तेथून गडबडीत निघून गेले. विमानात बसल्यावर त्यांना याची कल्पना आली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता, असे स्पष्टीकरण भसिन यांनी एअर इंडियाला दिल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com