मुलाच्या आत्महत्येनंतर आयएएस म्हैसकर दाम्पत्याने जुळ्या मुलींना दिला जन्म

वृत्तसंस्था
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

एकुलत्या एक मुलाच्या आत्महत्येनंतर आयएएस अधिकारी मनिषा आणि मिलिंद म्हैसकर दाम्पत्यांने जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. मुलाने केलेल्या आत्महत्येनंतर त्यांच्या आयुष्यात या मुलींच्या जन्माने मोठा आनंद आला आहे. कृत्रिम गर्भधारणेच्या मदतीने मनिषा म्हैसकर यांनी मुंबईत जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. सरोगेट मदरच्या माध्यमातून त्यांनी या दोन लहान मुलींना जन्म दिला आहे. 

मुंबई- एकुलत्या एक मुलाच्या आत्महत्येनंतर आयएएस अधिकारी मनिषा आणि मिलिंद म्हैसकर दाम्पत्यांने जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. मुलाने केलेल्या आत्महत्येनंतर त्यांच्या आयुष्यात या मुलींच्या जन्माने मोठा आनंद आला आहे. कृत्रिम गर्भधारणेच्या मदतीने मनिषा म्हैसकर यांनी मुंबईत जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. सरोगेट मदरच्या माध्यमातून त्यांनी या दोन लहान मुलींना जन्म दिला आहे. 

सगळ्यांचे आशिर्वाद आणि अधुनिक तंत्रज्ञानामुळे आपली रिती झालेली ओंजळ पुन्हा भरल्याची भावना मनिषा म्हैसकर यांनी यावेळी व्यक्त केली आहे. वयाच्या 49 व्या वर्षी मनिषा यांना अधुनिक तंत्रज्ञानाने मातृत्वसुख लाभले आहे. दरम्यान, म्हैसकर याच्या एकुलत्या एक मुलाने गेल्या वर्षी 20 मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती.

सध्या 50 वर्षीय मिलिंद म्हैसकर हे म्हाडाचे उपाध्यक्ष आणि सीईओ आहेत तर मनिषा म्हैसकर या नगरविकास खात्यात प्रधान सचिव आहेत.

Web Title: Senior bureaucrats get twin daughters through IVF after losing only son last year

टॅग्स