vaccination
vaccinationsakal

ज्येष्ठ नागरिकांना घराजवळच लस उपलब्ध

आरोग्य मंत्रालयाचा निर्णय; शाळा, पंचायत समित्यांमध्ये लसीकरण केंद्र

नवी दिल्ली : साठ वर्षांपुढील आणि आजारपणामुळे बाहेर जाता न येणारे, त्याचप्रमाणे विकलांग नागरिकांना आता त्यांच्या घराजवळच लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज जाहीर केला. याबाबतचे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. त्याचवेळी, ‘कोरोनाची दुसरी लाट अजून संपलेली नाही. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांत आरोग्य नियमांची ऐशीतैशी करू नका,’ असा इशाराही पुन्हा देण्यात आला आहे.

अशक्त आणि चालूही न शकणाऱ्या रूग्णांना त्यांच्या घरी जाऊनच लसीकरण करण्यात येईल, असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी आज सांगितले. ‘घरोघरी जाऊन सरसकट लसीकरणाचा प्रस्ताव कोविड-१९ तज्ज्ञ गटासमोर मांडण्यात आला होता. मात्र त्याला मंजुरी मिळालेली नाही. जे अजिबातच चालू शकत नाहीत आणि अत्याधिक अशक्त झाले आहेत त्यांच्यासाठीच हा पर्याय खुला राहील,’ असे पॉल यांनी स्पष्ट केले. ६० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या घराजवळ लसीकरण करण्यासाठी समाजमंदिरे, शाळा, पंचायत समिती कार्यालये आदींमध्ये वेगळी केंद्रे उघडण्यात येतील, असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले. यापैकी ज्यांनी लसीकरणासाठी ऑनलाइन नावनोंदणी केली नसेल, त्यांना लसीकरण केंद्रावर थेट जाऊनही नोंदणी करून लस घेता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

vaccination
पुणे : दुधाला प्रतिलिटर १ रुपया बोनस

सणासुदीत सावधान

सणासुदीच्या काळात नागरिकांनी विशेष सावधगिरी बाळगायला हवी, असा सल्ला आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिला. ते म्हणाले की, आजही देशातील ३३ जिल्ह्यांत दर आठवड्याला १० टक्क्यांहून जास्त नवे रूग्ण आढळत आहेत आणि अन्य २३ जिल्ह्यांत हे प्रमाण ५ ते १० टक्के आहे. केरळ, महाराष्ट्र, तमिळनाडू, मिझोराम, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांत अजूनही रूग्णसंख्या जास्त आहे. ज्या जिल्ह्यांमधे ५ टक्क्यांपेक्षा अधिक संक्रमणदर आहे तेथे सणासुदीच्या दिवसांतही कोरोना आरोग्य नियमांची सक्तीने अंमलबजावणी चालू ठेवावी.

ग्रामीण भारत पुढे

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशातील ६६ टक्के नागरिकांना पहिला डोस तर २३ टक्के नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. शहरी भागातील ३५.४ टक्के व ग्रामीण भागातील ६३. ७ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. सप्टेंबरमध्ये प्रतिदिन सुमारे ८१.७६ लाख लोकांना लसीकरण करण्यात येत आहे. राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत ८३ कोटी ३९ लाखांहून जास्त लसमात्रा पुरविण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com