काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयपाल रेड्डी यांचे निधन

वृत्तसंस्था
रविवार, 28 जुलै 2019

रेड्डी यांना गेल्या काही दिवसांपासून न्युमोनियाचा त्रास होऊ लागला होता. त्यामुळेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी रात्री त्यांची प्रकृती जास्तच बिघडली. त्यानंतर त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र ते अयशस्वी ठरले.

हैदराबाद : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी (वय 77) यांचे आज (रविवार) पहाटे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.

रेड्डी यांना गेल्या काही दिवसांपासून न्युमोनियाचा त्रास होऊ लागला होता. त्यामुळेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी रात्री त्यांची प्रकृती जास्तच बिघडली. त्यानंतर त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र ते अयशस्वी ठरले. हैदराबाद येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज रविवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

जयपाल रेड्डी यांचा जन्म 16 जानेवारी 1942 मध्ये हैदराबादमधील मदगुलमध्ये झाला होता. सध्या हे तेलंगना राज्यात येते. 1975 मध्ये जेव्हा आणीबाणी लागू झाली तेव्हा त्यांनी काँग्रेस विरोधात बंड पुकारले होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि जनता दलात गेले. 1985 ते 1988 हा काळ ते जनता दलाचे सरचिटणीस होते. मात्र 90 च्या दशकात ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले. केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या काळात जयपाल रेड्डी यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून पदभार सांभाळला होता. आंध्र प्रदेशात जयपाल रेड्डी चारवेळा आमदार आणि 5 वेळा खासदार म्हणून निवडून आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Senior Congress leader Jaipal Reddy passes away