ऑपरेशन थिएटरमध्ये दोघे अडकले एकमेकांच्या मिठीत

Senior Doctor Kissing Video With Nurse at Ujjain Hospital Goes Viral
Senior Doctor Kissing Video With Nurse at Ujjain Hospital Goes Viral

उज्जैनः ऑपरेशन थिएटर म्हटले की ही जागा फक्त ऑपरेशनसाठीच. पण नाही या थिएटरमध्ये एक वरिष्ठ डॉक्टर व नर्स एकमेकांना मिठी मारून चुंबन घेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

उज्जैन जिल्हा रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरमध्ये ही घटना घडली आहे. एक 49 वर्षांचा डॉक्टर व नर्स एकमेकांना मिठी मारून चुंबन घेत होते. संबंधित घटना कॅमेऱयामध्ये कैद झाली अन् व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. याप्रकरणी चुंबन घेत असलेल्या सिव्हिल सर्जनची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी शशांक मिश्रा यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

रुग्णालयातील नर्सचा व्हॉट्सऍपवर एक ग्रुप आहे. प्रथम या ग्रुपवर व्हिडिओ चुकून अपलोड झाला होता. पुढे तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आणखी तीन व्हिडिओ आहेत. मात्र, ते व्हिडिओ काढून टाकण्यात आले आहेत. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून संबंधित डॉक्टर रुग्णालयात आलेला नाही.

दरम्यान, या सिव्हिल सर्जनच्या जागी डॉ. पी. एन. वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणी आमच्याकडे कोणतीही तक्रार आली नसल्याचे स्थानिक पोलिसांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com