ज्येष्ठ कुचिपुडी नृत्यांगणा शोभा नायडू यांचे निधन 

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 15 October 2020

शोभा नायडू जन्म विशाखापट्टणमधील अनकापल्ली येथे १९५६मध्ये झाला होता. चित्रपटांत काम करण्याची संधी त्यांना प्रसिद्ध दिग्‍दर्शक के. विश्‍वनाथ यांनी देऊ केली होती.

हैदराबाद - ज्येष्ठ कुचिपुडी नृत्यांगणा शोभा नायडू (वय ६४) यांचे बुधवारी पहाटे येथे निधन झाले. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. 

शोभा नायडू जन्म विशाखापट्टणमधील अनकापल्ली येथे १९५६मध्ये झाला होता. चेन्नईत त्यांनी गुरू वेमपती चिन्न सत्यम यांच्याकडून नृत्याचे धडे गिरवले होते. चित्रपटांत काम करण्याची संधी त्यांना प्रसिद्ध दिग्‍दर्शक के. विश्‍वनाथ यांनी देऊ केली होती, पण नृत्याच्या प्रेमाखातर त्यांनी ती नाकारली.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नृत्यदिग्दर्शनासह त्यांच्या ‘विप्रनारायण कल्याण श्रीनिवासम’ या व अशा अनेक नृत्यनाटिका गाजल्या. यात त्यांनी सत्यभामा, देवदेवकी, पद्मावती, मोहिना आणि देवी पार्वती यांच्या भूमिका साकारल्या. नायडू यांच्या नृत्याला भारतासह विदेशात लोकप्रियता मिळाली होती. देशोदेशी त्यांचे विद्यार्थी आहेत. भारत सरकारने पद्मश्री किताब देऊन त्यांचा सन्मान केला होता. आंध्र प्रदेश सरकार व अन्य प्रतिष्ठीत संस्थांनीही त्यांच्या कलेचा गौरव केला होता. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शोभा नायडू कुचिपुडी नृत्यप्रकारात निपुण होत्या. नृत्यनाटिकांमधील सत्यभामा आणि पद्मावतीच्या भूमिका ही त्यांची ओळख बनली होती. 
के. चंद्रशेखर राव, मुख्यमंत्री, तेलंगण 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Senior Kuchipudi dancer Shobha Naidu passes away