संघाचे ज्येष्ठ प्रचारक माकपमध्ये जाणार

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

तिरुअनंतपुरम - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते पद्मकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदी निर्णयाच्या निषेधार्थ माकप पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

तिरुअनंतपुरम - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते पद्मकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदी निर्णयाच्या निषेधार्थ माकप पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

यासंदर्भातील घोषणा त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. गेल्या 42 वर्षांपासून ते संघात सक्रिय होते आणि विविध पदांवर त्यांनी काम केले. जिल्हा प्रचारक आणि हिंदू ऐक्‍यवादी स्टेटचे ते सचिव म्हणून काम केलेले आहे. ते म्हणाले की, नोटाबंदीच्या निर्णयाने आपल्याला धक्का बसला असून, या निर्णयाने आपण हताश झालो आहोत. या निर्णयामुळे सामान्यांची मोठी गळचेपी झाल्याचा आरोप पद्मकुमार यांनी केला. वयाच्या दहाव्या वर्षांपासून संघाचे काम करत आहोत; परंतु प्रथमच आपल्याला निराशा पदरी पडली आहे. नोटाबंदीने केरळातील नागरिकांची होत असलेली घुसमट मी पाहत आहे. ते सहन करण्यापलीकडचे आहे. त्यामुळे आपल्याला माकपमध्ये जाण्याची इच्छा असून, मागील चुकांबाबत आपण माफी मागतो, असेही पद्मकुमार म्हणाले.

Web Title: Senior leader of RSS entered in Marxwadi Communist Party