काश्मिरात फुटीरतावाद्यांची सीआरपीएफच्या गाडीवर दगडफेक

वृत्तसंस्था
रविवार, 27 मे 2018

श्रीनगर : जम्मू-काश्मिरमध्ये केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ)  गाडीवर फुटीरतावाद्यांनी दगडफेक केली. या दगडफेकीत गाडीला अपघात होऊन गाडीतील 19 जवान जखमी झाले आहेत. यातील काही जवान गंभीर जखमी झाले असून, त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

रविवारी पहाटे गस्तीवर जात असताना फुटीरतावादी गटांनी अचानक गाडीवर दगडफेक केली. यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. या घटनेतील अज्ञान फुटीरतावाद्यांविरोधात सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे. मागील काही दिवसात संपुर्ण जम्मू-काश्मिर मध्ये अनेक ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: Separatist of militant attack on CRPF van in Kashmir