काश्मीरमधील फुटीरतावाद्यांची पोलखोल

काश्मीरमधील फुटीरतावाद्यांची पोलखोल

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावादी नेते येथील स्थानिक तरुणांची माथी भडकवण्याचे काम करत आहेत. या नेत्यांमुळेच स्थानिक तरुणाई रस्त्यावर उतरून आक्रमक होत आहे. त्यादरम्यान जवानांवर दगडफेक करणे, देशविरोधी घोषणा देणे, असे प्रकार घडतात. मात्र, आता याच नेत्यांचा खरा चेहरा उघड झाला आहे.

फुटीरतावादी नेत्यांकडून देशविरोधी घोषणा देण्याचे काम केले जात आहे. यातील काही नेत्यांची मुले परदेशात शिक्षण घेत आहेत. गृहमंत्रालयाकडून फुटीरतावादी नेत्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये त्यांची मुले कुठं आणि सध्या काय करत आहेत, याची माहिती देण्यात आली आहे.

- आसिया अंद्राबी (दुख्तरान-ए-मिल्लत) : एक मुलगा मलेशियात तर दुसरा ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षण. 

- निसार हुसैन (वहीदत-ए-इस्लामी) : मुलगा आणि मुलगी दोघेही इराणमध्ये काम.

- बिलाल लोन : मुलगी ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षण. 

- जी. एम. भट्ट (आमिर-ए-जमात) : मुलगा सऊदी अरबमध्ये डॉक्टर. 

- अशरफ सहरई (चेअरमन, तहरीक-ए-हुर्रियत) : दोन मुले सौदी अरबमध्ये काम. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com