अखेर 'जेट' आज रात्रीपासून थांबणार!

वृत्तसंस्था
बुधवार, 17 एप्रिल 2019

- जेटची विमान वाहतूक सेवा तात्पुरत्या काळासाठी बंद.

नवी दिल्ली : आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजने अखेर आपली विमान वाहतूक सेवा तात्पुरत्या काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज रात्रीपासून ही विमानसेवा बंद होणार आहे.

जेट फ्युएल किंवा एव्हिएशन टर्बाइन फ्युएलच्या किंमतीत झालेली प्रचंड वाढ आणि देशांतर्गत स्पर्धेत तिकिटांचा लागलेला सेल यांमुळे सातत्याने होणारा तोटा यांमुळे देशांतर्गत विमान कंपन्यांची स्थिती अतिशय नाजूक बनली आहे. त्यामुळे सर्व सुविधांनी युक्त देशातील सर्वात मोठी विमान वाहतूक कंपनी जेट एअरवेजही प्रचंड आर्थिक संकटात सापडली आहे. परिणामी, कंपनीला उड्डाण संख्येत मोठ्या प्रमाणात घट करण्याची नामुष्की ओढवली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी कंपनीने बँकांकडे कर्ज उभारणीसाठी प्रयत्न सुरु केले होते. मात्र, किंगफिशर, एअर इंडियाचा कटू अनुभव पाठीशी असल्याने बँका विमान कंपन्यांना कर्ज देण्यास तयार नसल्याने जेट एअरवेजची आर्थिक परिस्थिती आणखीनच बिकट झाली. 

त्यानंतर आता अखेर जेट एअरवेजची ही विमानसेवा बंद करण्यात येणार असल्याने जेट विमानाचे आजचे होणारे उड्डाण अखेरचे असणारा आहे.

Web Title: Services of Jet Airways will be Stop From Tonight