esakal | अधिवेशनाची वेळ पूर्ववत करण्यात अडथळा
sakal

बोलून बातमी शोधा

Parliament

देशातील बहुतांश भागातून कोरोनाचा कहर कमी झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उत्तरार्धातील दोन्ही सभागृहांचे कामकाज पूर्वीप्रमाणे एकाच वेळी सकाळी ११ पासून चालवावे, असा मतप्रवाह संसदीय सचिवालयांमध्ये जोर धरू लागला आहे.

अधिवेशनाची वेळ पूर्ववत करण्यात अडथळा

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - देशातील बहुतांश भागातून कोरोनाचा कहर कमी झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उत्तरार्धातील दोन्ही सभागृहांचे कामकाज पूर्वीप्रमाणे एकाच वेळी सकाळी ११ पासून चालवावे, असा मतप्रवाह संसदीय सचिवालयांमध्ये जोर धरू लागला आहे. मात्र महाराष्ट्र-केरळमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने या योजनेलाही करकचून ब्रेक लागण्याची चिन्हे आहेत. संसदेच्या अधिवेशनाचा उत्तरार्ध ८ मार्च ते ८ एप्रिल असा महिनाभर चालणार असल्याचे जाहीर झाले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिल्लीसह देशाच्या बहुतांश राज्यांमध्ये कोरोना परिस्थिती नियंत्रणात असल्याचे दिसत असून रूग्ण बरे होण्याचा दर ९४ टक्कयांच्या पुढे गेल्याचा सरकारचा दावा आहे. तथापि, महाराष्ट्र व केरळ या राज्यातील परिस्थिती चिंता वाढविणारी असल्याचे आरोग्य मंत्रालयाने वारंवार सांगितले आहे. दोन्ही सभागृहांचे कामकाज सकाळी ११ पासून चालवायचे म्हणजेच सुरक्षित अंतरभान पाळण्याचा नियम बाजूला सारावा लागणार हे स्पष्ट आहे. कोरोना महामारीमुळे मागील वर्षीचे पावसाळी व यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आसन व्यवस्थेसह विशेष प्रकारे सुरू आहे.

VIDEO - दुकानदारांचा रस्त्यात राडा; पाणीपुरी खायला आलेल्यांच्या काळजाचं झालं 'पाणी-पाणी'

नियोजनानुसार सकाळी ९ ते दुपारी २ किंवा ३ पर्यंत राज्यसभा व सायंकाळी ४ ते रात्री ९ पर्यंत लोकसभेचे कामकाज चालते. कोरोनामुळे मागचे हिवाळी अधिवेशन रद्द करून तो कालावधी या अर्थसंकल्पी अधिवेशनात वाढविण्यात आला आहे. यात खासदारांची बसण्याची व्यवस्था दोन्ही सभागृहे व प्रेक्षक गॅलऱ्यांतही केली जाते. आरोग्य नियम व सुरक्षित अंतरभान पाळून बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. पीठासीन अधिकारी व खासदारंची भाषणे एकाच वेळी सर्व सभागृहांत एकू जावीत यासाठी ध्वनीव्यवस्थाही वेगळ्या पद्धतीने एक वेगळी केबल टाकून अद्ययावत करण्यात आली आहे. 

मंत्र्यांना बसावं लागतंय आकाशपाळण्यात; डिजिटल इंडियात नेटवर्कसाठी खटाटोप

लवकरच बैठक शक्य
राज्यसभा सचिवालयाच्या या मूळ प्रस्तावानुसार पूर्वीप्रमाणे संसद कामकाज चालविण्याबाबत लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी राज्यसभा सचिवालयाशी चर्चा केल्याचे समजते. मात्र आता दोन मोठ्या राज्यांत कोरोना विषाणूने पुन्हा डोके वर काढल्याने या मूळ प्रस्तावावर फेरविचार करावा लागणार आहे. १५ फेब्रुवारीपासून रूग्णसंख्या वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर ओम बिर्ला व राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बैठक घेतील, अशी माहिती आहे.

Edited By - Prashant Patil