निवडणुकीपूर्वी भाजपचा खासदार काँग्रेसच्या 'हाता'ला

वृत्तसंस्था
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

मीना यांचे भाऊ नमो नारायण मीनी हे सुद्धा काँग्रेसमध्येच आहेत. राजस्थानमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढाई असून, आता मीना यांचा काँग्रेसमध्ये जाण्यामुळे फटका बसणार हे निश्चित आहे. मीना यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने मी खूप आनंदी आहे. काँग्रेसमध्ये मी त्यांचे स्वागत करतो.

जयपूर : राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचा मोठा मोहरा काँग्रेसच्या हाताला लागला असून, दौसाचे खासदार हरिश्चंद्र मीना यांनी आज (बुधवार) काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

राजस्थानमधील सत्ताधारी भाजपसाठी हा मोठा झटका समजण्यात येत आहे. दौसामधील भाजपचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र मीना यांनी आज काँग्रेसमध्ये अशोक गेहलोत, सचिन पायलट यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. मीना हे 1976 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी राजस्थानचे माजी पोलिस महासंचालक म्हणूनही काम पाहिले आहे. राजस्थानमध्ये गेल्या महिन्यात भाजपचे संस्थापक जसवंतसिंह यांचा मुलगा मानवेंद्रसिंह यांना काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

मीना यांचे भाऊ नमो नारायण मीनी हे सुद्धा काँग्रेसमध्येच आहेत. राजस्थानमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढाई असून, आता मीना यांचा काँग्रेसमध्ये जाण्यामुळे फटका बसणार हे निश्चित आहे. मीना यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने मी खूप आनंदी आहे. काँग्रेसमध्ये मी त्यांचे स्वागत करतो.

Web Title: Setback For BJP Lawmaker From Rajasthan Harish Chandra Meena Joins Congress Ahead Of Polls