उबेर चालकाच्या खात्यात 7 कोटी!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

हैदराबाद : नोटांबदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर उबेर चालकाच्या निष्क्रिय असलेल्या खात्यात सात कोटींपेक्षाही अधिक रक्कम जमा झाल्याचे समोर आले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने प्राप्तिकर विभागातील सूत्रांच्या हवाल्याने याबाबतचे वृत्त दिले आहे.

हैदराबाद : नोटांबदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर उबेर चालकाच्या निष्क्रिय असलेल्या खात्यात सात कोटींपेक्षाही अधिक रक्कम जमा झाल्याचे समोर आले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने प्राप्तिकर विभागातील सूत्रांच्या हवाल्याने याबाबतचे वृत्त दिले आहे.

उबेर चालकाच्या स्टेट बॅंक ऑफ हैदराबादच्या खात्यात सात कोटींपेक्षा अधिक रक्‍कम जमा झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी निर्णय जाहीर केल्यानंतर पूर्वी जे खाते निष्क्रिय होते, अशा खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान संबंधित उबेर चालकाला तपासादरम्यान ही रक्कम कोठून आली आहे, याबाबत स्पष्टीकरण देता आलेले नाही. सविस्त तपासानंतर त्याच्या खात्यावर दोन व्यक्तींनी येऊन ही रक्कम भरल्याचे सीसीटीव्ही फुटेजेसमध्ये आढळले आहे. रक्कम जमा केल्यानंतर काही वेळाने टप्प्याटप्प्याने एका सराफा व्यापाऱ्याच्या खात्यात आरटीजीएसद्वारे पैसे पाठविण्यात आल्याचे आढळून आले आहे. याबाबत प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांच्या हवाल्याने एका इंग्रजी वृत्तपत्राने वृत्त दिले आहे.

नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर प्राप्तिकर विभागाने ठिकठिकाणी टाकलेल्या छाप्यांमधून 3 हजार 590 कोटी रुपयांची बेहिशेबी रक्कम आढळून आली आहे. त्यापैकी 93 कोटींपेक्षा अधिक रक्कम विभागाने देशभर टाकलेल्या छाप्यांमधून जप्त केली आहे. बेहिशेबी मालमत्तेच्यासंदर्भात प्राप्तिकर विभागाने 21 डिसेंबरपर्यंत 3,589 जणांना नोटीस दिली आहे.

Web Title: Seven crore in Uber Can Drivers account