मध्य प्रदेशातील अपघातात सात ठार 

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

मध्य प्रदेशात एसयूव्ही आणि ट्रक यांच्यात आज झालेल्या अपघातात सात जण ठार झाले, त्यात चार शिक्षकांचा समावेश असल्याचे पोलिसांनी आज सांगितले. शिवपुरी जिल्ह्यातील ग्वाल्हेर-बायोरा महामार्गावर एसयूव्ही आणि ट्रक यांच्यात हा अपघात झाला. या अपघातात मरण पावलेल्यांमध्ये सरकारी शाळांमधील चार शिक्षकांचा समावेश असून ते सर्वजण एसयूव्हीमधून प्रवास करीत होते, असे या सूत्रांनी सांगितले. 

शिवपुरी/बुऱ्हाणपूर : मध्य प्रदेशात एसयूव्ही आणि ट्रक यांच्यात आज झालेल्या अपघातात सात जण ठार झाले, त्यात चार शिक्षकांचा समावेश असल्याचे पोलिसांनी आज सांगितले. शिवपुरी जिल्ह्यातील ग्वाल्हेर-बायोरा महामार्गावर एसयूव्ही आणि ट्रक यांच्यात हा अपघात झाला. या अपघातात मरण पावलेल्यांमध्ये सरकारी शाळांमधील चार शिक्षकांचा समावेश असून ते सर्वजण एसयूव्हीमधून प्रवास करीत होते, असे या सूत्रांनी सांगितले. 

शिवपुरी गावाजवळ झालेल्या या कार अपघातात गाडीतील अन्य चार जण जखमी झाले असून सकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडल्याचे शिवपुरी जिल्हा बदरवास पोलिस ठाण्याचे प्रमुख राजीव त्रिपाठी यांनी सांगितले. आग्य्राच्या सहलीवरून आठ शिक्षकांचा हा गट सिहोरला परत येत असताना हा अपघात झाला, असे पोलिसांनी सांगितले. भारत सिंह (वय 55), विष्णू सेन (वय 47), रमेशचंद्र राय (वय 50), माखन सिंह (वय 42) असे अपघातात मरण पावलेल्यांची नावे आहेत, असे त्रिपाठी यांनी सांगितले. 

त्याशिवाय अन्य दुसऱ्या एका अपघातात मोटारसायकलवरून जाणारे तीन जण ट्रकची धडक बसल्याने ठार झाले, असे बुऱ्हाणपूरचे पोलिस अधीक्षक कमलेश श्रीवास्तव यांनी सांगितले. महंमद याकूब (वय 23), अशफाक (वय 19) आणि सय्यद अमीर (वय 22) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.

Web Title: seven died in road accident in madhyapradesh