तेलंगणामध्ये बस-ट्रक अपघातात सात ठार 14 जखमी

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 मे 2018

हैदराबादः छेंगरला गावामध्ये सरकारी बस व ट्रकमध्ये आज (मंगळवार) सकाळी झालेल्या अपघातामध्ये सात जणांचा मृत्यू झाला असून, 14 जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

तेलंगणा सरकारची बस वारंगल येथून करीमनगरकडे निघाली होती. छेंगरला गावामध्ये बस आल्यानंतर विरुद्ध बाजूने आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये बस व ट्रक चालकांचा समावेश आहे. जखमींमध्ये चार जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. अशी माहिती करीमनगरच्या ग्रामीण सहाय्यक पोलिस आयुक्त उषा राणी यांनी दिली.

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी जखमींवर तत्काळ उपचार करण्याचे आदेश अधिकाऱयांना दिले आहेत, अशी माहिती अधिकाऱयांनी दिली.

Web Title: Seven killed 14 injured in bus truck collision in Telangana