प. बंगाल : ट्रक-मोटरीच्या धडकेत सात ठार; दोन जखमी

वृत्तसंस्था
रविवार, 26 मार्च 2017

मागील एका आठवड्यात वर्धमान जिल्ह्यात तब्बल एक डझनहून अधिक अपघात झाले आहेत. त्यामध्ये 20 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

वर्धमान (पश्‍चिम बंगाल) - येथील कांक्‍स परिसरात ट्रक आणि मोटरीची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सात जण ठार तर दोन जण जखमी झाले आहेत.

नऊ जणांना घेऊन निघालेल्या मारूती मोटारीला बटाटे घेऊन जाणाऱ्या ट्रकची मोराग्राम जवळ धडक झाली. मोटरीतील प्रवासी ब्रिभूम जिल्ह्यातील पाथरचापुरी येथे आयोजित एक कार्यक्रम करून परतत होती. ट्रकची मोटारीला धडक एवढी जबरदस्त होती की पाच जण जागीच ठार झाले. तर अन्य चार जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने अपघातातील मृतांची संख्या सात वर पोचली आहे. जखमी दोघांची प्रकृतीही गंभीर असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, या पोलिस या घटनेचा तपास घेत असून ट्रक चालक फरार झाला आहे.

मागील एका आठवड्यात वर्धमान जिल्ह्यात तब्बल एक डझनहून अधिक अपघात झाले आहेत. त्यामध्ये 20 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

Web Title: Seven killed after van collides with truck in Burdwan