Video: रात्रीच्या अंधारात भूताचा गोंधळ...

वृत्तसंस्था
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

रात्रीचा अंधार गडद होऊ लागल्यानंतर रस्त्यावर भूत गोंधळ घालत होते. भूताची भिती अनेकांच्या मनात बसली. भूत कधी रस्त्यावर तर कधी घरासमोर तर कधी वाहनावर जाऊन बसत असे.

बंगळूरू (कर्नाटक): रात्रीचा अंधार गडद होऊ लागल्यानंतर रस्त्यावर भूत गोंधळ घालत होते. भूताची भिती अनेकांच्या मनात बसली. भूत कधी रस्त्यावर तर कधी घरासमोर तर कधी वाहनावर जाऊन बसत असे. नागरिकांमध्ये घबराहट पसरल्यानंतर पोलिसांना दखल घ्यावी लागली आणि 'भूतांना' ताब्यात घेतले.

शहरातील रस्त्यांवरील भूतांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 'भूतांना' पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर खरी परिस्थिती समोर आली. शहरातील सात युवक भूताचा वेश परिधान करून रस्त्यांवरून फिरत होते. नागरिकांना घाबरून व्हिडिओ यूट्यूबर अपलोड करत होते. मात्र, यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. रात्रीच्या वेळी नागरिक घराबाहेर पडत नसत. भूताची चर्चा शहरात वेगाने पसरली होती. यामुळे पोलिसांपुढेही आव्हान निर्माण झाले होते. सीसीटीव्ही व सोशल मीडियावरील व्हिडिओच्या माध्यमातून अखेर शान मलिक, निवाद, सैम्युअल मोहम्मद, मोहम्मद अख्यूब, शाकिब, सयैद नाबील, युसूफ अहमद या सात जणांना ताब्यात घेण्यात आले. याबाबतची पुढील चौकशी सुरू आहे.

युवकांनी चौकशीदरम्यान सांगितले की, गंमत म्हणून पांढरे कपडे व मोकळे केस सोडून अंधारात फिरत होतो. नागरिकांना घाबरवल्यानंतर व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केले. या व्हिडिओंना नेटिझन्सनी मोठी पसंती मिळत होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: seven youtubers arrested for dressing as ghosts and scaring people in bengaluru