झारखंडमध्ये अवैध कोळसा खाणीत अपघात; अनेक जण अडकल्याची भीती

खाणीमध्ये अनेक कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
झारखंडमध्ये अवैध कोळसा खाणीत अपघात; अनेक जण अडकल्याची भीती

धनाबाद : झारखंडमधील धनबाद जिल्ह्यात येथील एका कोळसा खाणीत अपगात झाल्याचे वृत्त समोर येत आहे. घडलेली घटना अवैध कोळसा खाणीत झाल्याचे समोर येत असून, खाणीमध्ये अनेक कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले असून, आतापर्यंत जखमी किंवा मृत्यूचे वृत्त समोर आलेले नाही. प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे की, धनबादमधील तात्पुरत्या बंद असलेल्या कोळसा खाणीजवळ 60 फूट रस्ता खचल्याने हा अपघात झाल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, धनबादमधील निरसा ब्लॉकमधील डुमरजोर गावात भारत कोकिंग कोल लिमिटेडच्या (BCCL) तात्पुरत्या बंद केलेली खाण आहे. त्यात काम सुरू असताना खाण लीज क्षेत्राजवळ धनबादमध्ये सकाळी 8:30 च्या सुमारास 60 फूट असलेला कच्चा रस्ता खचल्याने हा अपघात घडला.

दरम्यान, घटनेत अद्यापपर्यंत कोणतीही जीवित अथवा जखमी असल्याचे वृत्त समोर आलेले नाही, अशी माहिती धनाबादचे उपआयुक्तांवी एएनआयशी बोलताना दिली आहे. घटनेवेळी खाणीमध्ये किती कामगार काम करत होते याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समजू शकलेली नाही. अशाच प्रकारची एक घटना या वर्षी फेब्रुवारीमध्ये झारखंडमध्ये घडली होती. त्यावेळीदेखील एका बेकायदेशीर कोळसा खाणीत बेकायदेशीरपणे काम सुरू असताना खाणकामाची उपकरणे जवळपास 20 फूट उंचीवरून खाली पडल्याने अपघात झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com