एक रुपयाची लाच घेतली तरीही होईल कारवाई : गोयल

वृत्तसंस्था
शनिवार, 1 एप्रिल 2017

जर एकाही व्यक्तीने एक रुपयाची जरी लाच घेतली तरीही त्याच्यावर कडक कारवाई होईल. ज्या कोणाला या नव्या व्यवस्थेमध्ये काम करायची इच्छा नसेल, त्यांनी सोमवारी सकाळपर्यंत राजीनामा द्यावा आणि घरी बसावे. माझ्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती आहे आणि आता उत्तर प्रदेशमधील सर्व कनिष्ठ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही हे लक्षात ठेवावे. प्रत्येकाने आपल्या कामावर लक्ष द्यावे आणि कोणतीही आक्षेपार्ह प्रतिक्रिया व्यक्त करू नये.
- पियुष गोयल

नवी दिल्ली - ऊर्जा विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना कामावर लक्ष केंद्रित करण्याची सूचना देत केंद्रीय ऊर्जा मंत्री पीयूष गोयल यांनी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना कडक शब्दात इशारा दिला आहे. "एक रुपयाची जरी लाच घेतली तरीही कारवाई होईल', अशा शब्दांत त्यांनी इशारा दिला आहे.

गोयल यांनी आज (शनिवार) उत्तर प्रदेशचे ऊर्जा मंत्री श्रीकांत शर्मा यांच्यासोबत उत्तर प्रदेशमधील पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनला अचानक भेट दिली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "जर एकाही व्यक्तीने एक रुपयाची जरी लाच घेतली तरीही त्याच्यावर कडक कारवाई होईल. ज्या कोणाला या नव्या व्यवस्थेमध्ये काम करायची इच्छा नसेल, त्यांनी सोमवारी सकाळपर्यंत राजीनामा द्यावा आणि घरी बसावे. माझ्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती आहे आणि आता उत्तर प्रदेशमधील सर्व कनिष्ठ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही हे लक्षात ठेवावे. प्रत्येकाने आपल्या कामावर लक्ष द्यावे आणि कोणतीही आक्षेपार्ह प्रतिक्रिया व्यक्त करू नये.'

"दर्जा, प्रामाणिकपणा, निष्ठा, वेळेत काम या गुणांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. जात, धर्मावरून भेदभाव केला जाणार नाही. मंत्र्यांनीही कोणतीही मुक्त प्रतिक्रिया व्यक्त करू नये', असेही यावेळी गोयल यांनी स्पष्ट केले.

Web Title: Severe action will be taken against corrupt : Goyal