शॉपिंग मॉलमध्येच चालायचे सेक्स रॅकेट; 17 महिलांसह 24 जणांना अटक

वृत्तसंस्था
Wednesday, 14 August 2019

गुरुग्राम शहरात शॉपिंग मॉलमध्येच सेक्स रॅकेट चालायचे. पोलिसांनी याचा फर्दाफाश केला असून 24 जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये 2 मुली, 15 महिला, स्पा सेंटरचा मॅनेजर आणि 7 ग्राहकांचा समावेश आहे.

गुरुग्राम : गुरुग्राम शहरात शॉपिंग मॉलमध्येच सेक्स रॅकेट चालायचे. पोलिसांनी याचा फर्दाफाश केला असून 24 जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये 2 मुली, 15 महिला, स्पा सेंटरचा मॅनेजर आणि 7 ग्राहकांचा समावेश आहे.

हरियाणातील गुरुग्राममध्ये एका शॉपिंग मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करण्यात येत होता. पोलिसांना याबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या शॉपिंग मॉलवर कारवाई केली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी शरीरविक्री करणाऱ्या मुली सापडल्या. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री करुनच पोलिसांनी कारवाई केली आहे. शरीरविक्री करणाऱ्या तरुणी या राजस्थान, तमिळनाडू, दिल्ली, मणिपूर, पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यातील असल्याचे सांगण्यात येत असून या प्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांची नामी युक्ती
स्पा सेंटरवर छापा टाकण्याआधी पोलिसांनी एक युक्ती वापरली. पोलिसांच्या टीममधील एकजण या स्पा सेंटरमध्ये ग्राहक म्हणून गेला. पूर्ण चौकशी केली. बोलणी झाल्यानंतर त्याने आपल्या टीमला सूचना केली. त्यानंतर पोलिसांच्या टीमने तिथं छापा टाकला. यावेळी काही तरुणी ग्राहकांसोबत आक्षेपार्ह अवस्थेतही  आढळून आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sex racket busted, 15 women among 24 arrested in Gurugram