'शबरीमला'प्रकरणी कोचीत निषेध मोर्चा

'शबरीमला'प्रकरणी कोचीत निषेध मोर्चा

तिरुअनंतपुरम : शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीविरोधात हजारो भाविकांनी शनिवारी कोचीत मोर्चा काढला होता. दरम्यान, भूमाता ब्रिगेडच्या नेत्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी मंदिराला लवरकरच भेट देऊ, असे जाहीर केले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश अंमलात आणण्याचा निर्णय केरळमधील सत्ताधारी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डाव्या लोकशाही आघाडी (एलडीएफ) सरकारने घेतला आहे. मासिक पूजेसाठी मंदिर बुधवारी (ता. 17) सायंकाळी खुले राहणार आहे. त्यासाठी येणाऱ्या भाविकांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेण्यासाठी सरकारने येथे बैठक घेतली.

तृप्ती देसाई यांची मंदिर भेटीच्या नियोजनाबाबत सरकारकडून कोणतीही भूमिका जाहीर झालेली नाही. मात्र महिलांच्या मंदिर प्रवेशाला विरोध असलेले भाविक आणि भाजपमध्ये याचे तीव्र प्रतिसाद उमटले आहेत. येथील पदालम राजघराण्यातील सदस्य शशीकुमार वर्मा यांनी देसाई यांच्यावर टीका केली आहे. देसाई यांनी कोणतीही चिथावणीखोर कृती करू नये, अशी विनंती त्यांनी केली. तसेच शबरीमलात कायदा व सुवस्था राखण्याचे प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी राज्य सरकारला केले. 

तृप्ती देसाई यांनी मुंबईत बोलताना प्रार्थनेसाठी महिलांच्या एका गटासह लवकरच त्या मंदिराला भेट देणार असल्याचे सांगितल्याचे वृत्त मल्लाळी दूरचित्रवाहिन्यांनी दिले आहे. त्या म्हणाल्या की, महिलांच्या मूलभूत हक्कांविरोधात कॉंग्रेस आणि भाजप आहे का? असा सवाल मला करायचा आहे. या प्रकरणी पक्षांनी त्यांची भूमिका मांडायला हवी.

दरम्यान, सर्व महिलांना मंदिर प्रवेश देण्याविरोधात आज हजारो भाविकांनी कोचीच्या वर्दळीच्या रस्त्यांवरून मोर्चा काढला. या वेळी त्यांच्या हातात अय्यप्पा देवाची छायाचित्रे असलेले फलक होते व सर्व जण अय्यप्पाची भजने, स्तोस्त्र म्हणत होते. भाजपच्या नेतृत्वाखालील "एनडीए'ने काढलेला मोर्चा आज कोल्लम जिल्ह्यात पोचला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com