शहाबुद्दीनची रवानगी तिहार तुरुंगात करा

वृत्तसंस्था
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

सर्वोच्च न्यायालयाचे बिहार सरकारला आदेश

नवी दिल्ली: राजदचा वादग्रस्त नेता मोहंमद शहाबुद्दीनची बिहारच्या सिवान तुरुंगातून तिहार तुरुंगात रवानगी करण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले. बिहारबाहेर स्थलांतरित केल्याने शहाबुद्दीनच्या विरोधात दाखल असलेल्या खटल्याची सुनावणी निष्पक्षपणे होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. शहाबुद्दीनला कोणत्याही प्रकारची विशेष वागणूक देऊ नये, असेही निर्देश दिले.

न्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्यायाधीश अमिताव रॉय यांच्या पीठाने सरकारला शहाबुद्दीनला एका आठवड्यात तिहार तुरुंगात आणण्याचे निर्देश दिले. स्वतंत्र, निःष्पक्ष सुनावणी करणे हे न्यायालयाचे कर्तव्य आणि जबाबदारी असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने या वेळी व्यक्त केले. शहाबुद्दीनच्या विरोधात असलेल्या खटल्यांची सुनावणी तुरुंगातच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होईल. सिवानचे चंद्रकेश्‍वर प्रसाद आणि आशा रंजन यांनी राजदच्या नेत्यास सिवान तुरुंगातून हलवण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. प्रसाद यांचे तीन मुले दोन वेगवेगळ्या घटनेत मारले गेले आणि आशा यांचे पती राजदेव रंजन यांची सिवान येथे हत्या करण्यात आली होती. या घटनेमागे शहाबुद्दीन मास्टरमाइंड असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे शहाबुद्दीनच्या विरोधात प्रलंबित खटल्याची सुनावणी स्वतंत्र आणि निःष्पक्ष होण्यासाठी त्यांना सिवान तुरुंगातून राज्याच्या बाहेर अन्य तुरुंगात हलवावे अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. तत्पूर्वी बिहार सरकारने शहाबुद्दीनला राज्याबाहेर नेण्यास विरोधात नसल्याचे स्पष्ट केले होते. शहाबुद्दीन हा क्षारखंडच्या एका प्रकरणासहीत 45 खटल्यांचा सामना करत आहे. दरम्यान, आशा रंजन यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. न्यायालयाच्या आदेशाने नागरिकांना दिलासा मिळाला असून, आता शहाबुद्दीन पुरावे आणि साक्षीदार नष्ट करणार नाहीत, असे रंजन यांनी नमूद केले.

Web Title: Shahabuddin sent tu tihar jail