शेख हसीना यांना मनद डी.लिट. प्रदान

वृत्तसंस्था
शनिवार, 26 मे 2018

असनसोल : काझी नझरूल विद्यापीठातर्फे आज बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना मानद डी.लिट. पदवी प्रदान करण्यात आली. या वेळी बोलताना हसीना यांनी भारत आणि बांगलादेश मैत्रीला उजाळा दिला. 

आमचे राष्ट्रीय कवी काझी नझरूल इस्लाम यांच्या नावे विद्यापीठाची स्थापना केल्याबद्दल पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे मी आभार मानते, असे हसीना म्हणाल्या. या विद्यापीठाकडून मानद डी.लिट. पदवी स्वीकारताना मला आनंद होतो आहे. हा प्रत्येक बांगलादेशी नागरिकाचा सन्मान आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

बंगालचे विभाजन झाले असले, तरी टागोर आणि नझरूल या दोन महान कवींचे विभाजन झालेले नाही, असे हसीना म्हणाल्या. संकटाच्या काळात मला आणि माझ्या बहिणीला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतात आश्रय दिला होता, याचीही आठवण त्यांनी या वेळी बोलताना करून दिली. 

बांगलादेश मुक्ती संग्रामात भारताने केलेली बहुमोल मदत आणि भारतीय सैनिकांनी दिलेले बलिदान आमचा देश कधीही विसरणार नाही. 
- शेख हसीना, बांगलादेशच्या पंतप्रधान

Web Title: Shaikh Hasina honored with Doctorate