esakal | जेलरचे कारागृहातच अश्लिल चाळे; महिला कैद्यांकडून मसाज, अश्लील डान्स
sakal

बोलून बातमी शोधा

jailar.jpg

हिसार जेलचा जेलर समशेर सिंग दहिया सध्या साेशल मिडियात माेठ्या प्रमाणावर ट्राेल हाेत आहे. त्याचे कारनामे वाचून सगळेच दंग आहेत.

जेलरचे कारागृहातच अश्लिल चाळे; महिला कैद्यांकडून मसाज, अश्लील डान्स

sakal_logo
By
वृत्तसंस्था

हरियाणा : हिसार जेलचा जेलर समशेर सिंग दहिया सध्या साेशल मिडियात माेठ्या प्रमाणावर ट्राेल हाेत आहे. त्याचे कारनामे वाचून सगळेच दंग आहे. 

आपण जुन्या काळातल्या अनेक चित्रपटांमध्ये अन्याय करणारा जेलर पाहिला आहे. परंतू 21 व्या शतकात देखील असा जेलर आहे, असे सांगितले तर यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. हरियाणातील हिसार येथील जेलचा असणारा जेलर हा जुन्या चित्रपटातील पात्रालाही लाजवेल असे कारनामे करत आहे. त्याच्या कारनाम्यांमुळे हा जेलर सध्या सोशल मिडियामध्ये ट्रोल होत आहे.

या जेलरचे नाव आहे समशेर सिंग दहिया. हा जेलमधील कैद्यांवर सगळ्या प्रकारचे अत्याचार करत आहे, अशी मिडियामध्ये चर्चा आहे. त्याचप्रमाणे हा खुप भ्रष्टाचारी असल्याचेही सांगितले जात आहे. प्रत्येक कैद्यामागे एक वेळच्या खाण्यासाठी 90 रुपये खर्च केले जातात, पण त्यातील प्रत्येक कैद्यामागे 10 रुपये हा समशेर सिंग दहिया खात असल्याचे बोलले जात आहे. हा जेलर जर त्याच्याविरोधात कोणी बोलले तर त्यांच्यावर अमानुष अत्याचार करून त्यांचा आवाज बंद करतो.

दरम्यान, कैद्यांना मोठ्या प्रमाणावर अन्याय, अत्याचाराला सामोरे जावे लागत असल्याने मिडियाने अनेकदा समशेर सिंग दहिया याच्या विरोधात आवाज उठविला, पण त्याचा काही उपयोग होत नाही कारण त्याचे वरिष्ठ राजकीय कनेक्शन आहेत.         

जेलध्येच करवतो अश्लील डान्स -
बंदी कैद्यावर हा फक्त अन्यायच नाही; तर हा जेलमध्ये असलेला महिला कैद्यांना अश्लील डान्स आणि अश्लील चाळे करायला भाग पाडतो. तसेच महिलांकडून मसाज करवून घेताे. दहिया याच्याविराेधात अनेकदा महिलांनी विनयभंग आदीबाबत तक्रारी दिल्या परंतू त्याच्याविराेधात कारवाई केली जात नाही. जर कोणी विरोध केला तर तो त्या महिलांना अमानुष मारहाण करतो. याच समशेर सिंग दहियाची सोशल मिडियामध्ये सद्या जोरदार चर्चा आहे.
 

loading image
go to top