मोदींना नोटबळींचा शाप लागेल - शंकराचार्य

वृत्तसंस्था
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

नरसिंहपूर - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे बँकांबाहेर होत असलेल्या मृत्यूंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना शाप लागेल, असे वादग्रस्त वक्तव्य द्वारका-शारदा पीठाचे शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनी केले आहे.

नोटबंदीच्या निर्णयामुळे देशभरात आतापर्यंत 55 जणांचा मृत्यू झाला आहे. पहाटेपासून नागरिकांना नोटा बदलण्यासाठी किंवा भरण्यासाठी बँकांबाहेर थांबावे लागत आहे. एटीएममध्ये पैसे नसल्याने अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याच मुद्द्यावरून शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वतींनी मोदींना लक्ष्य केले आहे.

स्वरुपानंद सरस्वती म्हणाले, की पंतप्रधान मोदींचे शासन हे इंग्रजांपेक्षा वाईट आहे. पंतप्रधानांचा नोटबंदीचा निर्णय एकदम चुकीचा आहे. मोदी हे देशाचे सेवक म्हणून नाही तर खलनायकाप्रमाणे वागत आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यापासूनचे हिशोब घेणार असल्याचे वक्तव्य करून ते देशाला धमकावत आहेत. हे काम कायद्याचे आहे. सतत नागरिकांना अडचणीत टाकणे, ही लोकशाही नाही.

Web Title: shankaracharya gives controversial statement on pm narendra modi for note ban