...तेव्हा मात्र टीकेचा त्रास होतो - शरद बोबडे

Sharad-Bobade
Sharad-Bobade

नवी दिल्ली - महत्त्वाच्या खटल्यांच्या सुनावणीनंतर न्यायाधीशांनी दिलेल्या निकालावर सोशल मीडियातून होणाऱ्या अनिर्बंध टीकेची सर्वोच्च न्यायालयाचे नवनियुक्त सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी आज गंभीर दखल घेतली. बऱ्याचदा सोशल मीडियातील टीकेनंतर न्यायाधीशांना त्यांची छळवणूक झाल्यासारखी वाटते आणि त्यांना या टीकेला सामोरे जाणे अवघड जाते, हे पाहून मला त्रास होतो, असे बोबडे यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले. सोशल मीडियातील अनिर्बंध टीकेमुळे या साऱ्या प्रकरणालाच महाघोटाळ्याचे रूप येते आणि त्यामुळे न्यायाधीशांचीदेखील अप्रतिष्ठा होते, असेही त्यांनी नमूद केले.

प्रत्यक्ष निकालाऐवजी तसा निवाडा करणाऱ्या न्यायाधीशावरच टीका करणे, हा गुन्हा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सोशल मीडियातील टीकेमुळे आपल्याला त्रास होतो का, असा सवाल विचारण्यात आला असता बोबडे म्हणाले, ‘‘विशिष्ट मर्यादेनंतर या टीकेचा जेव्हा न्यायालयाच्या कामकाजावर परिणाम होतो आणि न्यायाधीशांनाही त्यांची छळवणूक झाल्यासारखे वाटते तेव्हा मात्र याचा मला त्रास होतो. प्रत्येक जणच हा टीका टाळण्याएवढा कठोर असतोच, असे नाही.’’

बंधन घालू शकत नाही
विविध प्रकारच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून होणारी बेलगाम टीका आणि चिकित्सेवर न्यायालय बंधन घालू शकत नाही, असे सांगतानाच त्यांनी अशा प्रकारच्या माध्यमांवर काय कारवाई करायला हवी, हे आम्हाला माहिती नाही. यामुळे हा सगळा व्यवहारच पुढे एक मोठे स्कॅंडल होऊन बसतो आणि त्यामुळे न्यायालयाचीदेखील अप्रतिष्ठा होते, अशी खंत व्यक्त केली. कोणत्याही न्यायपालिकेने सर्वाधिक वेगाने निवाडा कसा होईल, यावरच लक्ष दिले पाहिजे. पण, त्यामध्ये घाईदेखील होता कामा नये, असे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com