शरद पवार यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची घेतली भेट: राजकीय वर्तुळात चर्चांना उधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Upa-Rashtrapati Nivas

शरद पवार यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची घेतली भेट: राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पूर्वाश्रमीचे भाजप नेते एकनाथ खडसे शरद पवार यांच्या उपस्थितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत आशा चर्चा शनिवारी येत होत्या. तसेच खडसे पुन्हा भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्या येत होत्या परंतु राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी हे फेटाळले आहे. शरद पवारांची आणि अमित शाहांची भेट झालेली नसून, खडसे आणि शाहांची फोनवर चर्चा झाल्याचे तपासे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान शनिवारी शरद पवारांनी नवनिर्वांचीत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची उपराष्ट्रपती निवास येथे भेट घेतली आहे. भेटी मागचे कारण अद्यापही समजू शकले नाही. परंतु या भेटी मुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.

टॅग्स :Sharad Pawar