मग यावर्षीच का हे घडले : शरद पवार

Sharad Pawar
Sharad Pawar

नवी दिल्ली - कोरेगाव भीमा येथे गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक जात आहेत. मग, यावर्षीच याठिकाणी दंगल का घडली. गेल्या महिन्याभरापासून सांप्रदायिक संघटना येथील नागरिकांना भडकाविण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारने या प्रकरणी दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीप्रकरणी शरद पवार यांनी आज (गुरुवार) राज्यसभेत वक्तव्य केले. या वेळी त्यांनी या पूर्ण घटनेबाबत माहिती देताना सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले.

शरद पवार म्हणाले, की ब्रिटीशांच्या सैन्यात महार रेजिमेंट होती, ती आजही आहे. देशाच्या सुरक्षेसाठी असलेली ही रेजिमेंट आहे. या रेजिमेंटने पेशव्यांना हरविले होते. ज्याठिकाणी त्यांना हरविले होते. तेथे दलित समुदायातील नागरिक दरवर्षी एकत्र येतात. मला स्वतःला 50 वर्षांपासून हे माहिती आहे. तसेच याठिकाणी जाताना रस्त्यात असलेल्या गावांतील नागरिक मदत करत असतात. मग, यावर्षीच येथे दंगल का झाली? गेल्या महिनाभरापासून सांप्रदायिक संघटना वढू या गावी जाऊन नागरिकांना भडकाविण्याचा प्रयत्न करीत होती. मी त्या दोन संघटनांचे नाव याठिकाणी घेणार नाही. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून, जास्त बोलणे योग्य नाही. एक जानेवारीला दगडफेक, जाळपोळ करण्यात आली. आता मी नागरिकांना आवाहन करतो, की सर्वांना शांतता राखून एकत्र आले पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com