निवडणुकीवेळी तिसरी आघाडी अव्यवहार्य : शरद पवार

वृत्तसंस्था
शनिवार, 30 जून 2018

तिसरी आघाडी विविध पक्षांसाठी व्यावहारिक नाही. मात्र, काही सहकारी पक्षांचे नेते महाआघाडी बनविण्यासाठी इच्छुक आहेत. तसेच त्यांनी पंतप्रधानपदाच्या उमेदवारावरही चर्चा केली होती. तिसरी आघाडी ही व्यावहारिक आघाडी नाही. त्यामुळे तिसरी आघाडी बनू शकत नाही. 

- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

नवी दिल्ली : 2019 होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांव्यतिरिक्त तिसरी आघाडी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पक्षांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार झटका दिला आहे. शरद पवार म्हणाले, की ''तिसरी आघाडी ही 'व्यावहारिक' आघाडी नाही. त्यामुळे तिसरी आघाडी बनू शकत नाही''.

माजी पंतप्रधान आणि जेडीएसचे अध्यक्ष एच. डी. देवेगौडा तिसरी आघाडीबाबत उत्सुक आहेत. याबाबत देवेगौडा यांनी काल (शुक्रवार) वक्तव्यही केले होते. तसेच तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख चंद्रशेखर राव यांनीही तिसरी आघाडीबाबत चर्चा केली होती.

एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी तिसरी आघाडीबाबत भाष्य केले. ते म्हणाले, तिसरी आघाडी विविध पक्षांसाठी व्यावहारिक नाही. मात्र, काही सहकारी पक्षांचे नेते महाआघाडी बनविण्यासाठी इच्छुक आहेत. तसेच त्यांनी पंतप्रधानपदाच्या उमेदवारावरही चर्चा केली होती. तिसरी आघाडी ही व्यावहारिक आघाडी नाही. त्यामुळे तिसरी आघाडी बनू शकत नाही. 

 

Web Title: Sharad Pawar Says Third Front Is Not Practical In Lok Sabha Elections 2019