Wrestlers Protest : 'दिल्ली पोलिसांच्या या कृत्याचा मी...'शरद पवार संतापले

शरद पवार यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला
 Sharad Pawar
on Wrestlers Protest
Sharad Pawar on Wrestlers Protest

लोकशाही मार्गाने आपल्या मागण्यांसाठी न्याय मागत असलेल्या महिला कुस्तीपटूंना दिल्ली पोलिसांनी दिलेली वागणूक अत्यंत वेदनादायक आहे. दिल्ली पोलिसांच्या या कृत्याचा मी तीव्र निषेध करतो. असे ट्विट करत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निषेध व्यक्त केला आहे. (Sharad Pawar slams Centre as Delhi Police detains wrestlers)

जंतर-मंतरवर सुरू असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलंनाविरोधात रविवारी पोलिसांनी कडक कारवाई केली . दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरहून नवीन संसद भवनाकडे कूच करणाऱ्या कुस्तीपटूंना ताब्यात घेतले. दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरवरील कुस्तीपटूंचा तंबूही हटवला.

 Sharad Pawar
on Wrestlers Protest
Wrestlers Protest : आंदोलक पैलवानांवर दिल्ली पोलिसांकडून गुन्हे दाखल; 'या' कलमांतर्गत कारवाई

काय म्हणाले शरद पवार?

यानंतर शरद पवार यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. 'लोकशाही मार्गाने आपल्या मागण्यांसाठी न्याय मागत असलेल्या महिला कुस्तीपटूंना दिल्ली पोलिसांनी दिलेली वागणूक अत्यंत वेदनादायक आहे.

आपल्या देशाची शान असलेल्या कुस्तीपटूंना अशाप्रकारे वर्तणूक देणे आणि ताब्यात घेणे अत्यंत निषेधार्ह आहे. दिल्ली पोलिसांच्या या कृत्याचा मी तीव्र निषेध करतो. या क्रूरतेच्या कृत्याने आज आपली लोकशाही मूल्ये अपमानित झाली आहेत.' अशा आशयाचे ट्विट शरद पवार यांना केलं आहे.

 Sharad Pawar
on Wrestlers Protest
New Parliament House : नव्या संसदेतून नवा भारत घडेल - पंतप्रधान नरेंद्र मोदी

नविन संसद भवनासमोर नेमकं काय घडलं?

कुस्तीपटूंनी नवीन संसद भवनाकडे कूच केल्यानंतर पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. पोलिसांनी १०९ जणांना ताब्यात घेतलं होतं. संपूर्ण दिल्लीमधून पोलिसांनी ८०० जणांना ताब्यात घेतलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com