तुकाराम बँकेची प्रगती कौतुकास्पद : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

महाराष्ट्र एकिकरण समितीतर्फे सीपीएड मैदानावर आयोजित जाहीर सभेसाठी यांचे शनिवारी (ता. 31) सकाळी बेळगावात आगमन झाले. म. ए. समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जागोजागी जंगी स्वागत केले. त्यानंतर पवार यांनी शहरातील काही संस्थांना भेट देऊन लोकांशी संवाद साधला. सर्वप्रथम त्यांनी शहापूरमधील तुकाराम सहकारी बॅंकेला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. 

बेळगाव : तुकाराम बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना आर्थिक मदत होत आहे. शून्य एनपीए असलेल्या बँका भरभराटीस येतात. तुकाराम बँकही त्यापैकीच एक आहे. बँकेने गेल्या काही वर्षात केलेली प्रगती कौतुकास्पद आहे. येत्या काळात ही बँक मोठी झेप घेईल, असा विश्‍वास माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्‍त केला. 

महाराष्ट्र एकिकरण समितीतर्फे सीपीएड मैदानावर आयोजित जाहीर सभेसाठी यांचे शनिवारी (ता. 31) सकाळी बेळगावात आगमन झाले. म. ए. समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जागोजागी जंगी स्वागत केले. त्यानंतर पवार यांनी शहरातील काही संस्थांना भेट देऊन लोकांशी संवाद साधला. सर्वप्रथम त्यांनी शहापूरमधील तुकाराम सहकारी बॅंकेला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. 

ते पुढे म्हणाले, महाराष्ट्र, कर्नाटक व गुजरातमधील सहकारी बँका चांगले कार्य करीत आहेत. बँकेतून कर्ज घेतल्यानंतर व्यवसाय वाढवावा. पण घेतलेली रक्‍कम योग्य वेळेत भरुन सहकार्य केल्यास बॅंकेची प्रगती होते. तुकाराम बँकेने अर्थकारण हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कार्य करावे. त्यामुळे बँक सुरु करताना ठेवलेला हेतू पूर्ण होईल, असा सल्ला त्यांनी दिला. 

मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी बॅंकेच्या कार्याचा आढावा घेतला. बॅंकेतील नवीन लॉकरचे उदघाटन पवार यांच्या हस्ते झाले. प्रारंभी त्यांनी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन केले. बॅंकेचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी श्री. पवार यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडीक, आमदार अरविंद पाटील, माजी आमदार मनोहर किणेकर, उपमहापौर मधुश्री पुजारी यांचेही स्वागत करण्यात आले. यावेळी बिदर म. ए. समिती अध्यक्ष रामराव राठोड, ओरीएंटल स्कूल यांच्यासह विविध संस्थांनी श्री. पवार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

Web Title: Sharad Pawar statement on Tukaram Bank in Belgaum