लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत शरद पवारांचा खुलासा

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 6 ऑक्टोबर 2018

शरद पवार यांनी आज आपल्या निवडणूक लढवण्यासंदर्भात सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला. आज मुंबईच्या बेलार्ड ईस्टेट परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सकाळी 10 वाजता पक्षाची बैठक सुरू झाली असून, या बैठकीला वरिष्ठ नेते पदाधिकारी उपस्थित आहेत, ही बैठक सुमारे 9 तासापर्यंत सुरू राहणार आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लोकसभा निवडणूक लढविण्यावरुन गेल्या काही दिवसांपासून अनेक तर्कवितर्क लढवण्यात येत होते. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात सुरू आजपासून सुरु झाली आहे. या बैठकीला पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. या बैठकीत आपण आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असे करत शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

शरद पवार यांनी आज आपल्या निवडणूक लढवण्यासंदर्भात सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला. आज मुंबईच्या बेलार्ड ईस्टेट परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सकाळी 10 वाजता पक्षाची बैठक सुरू झाली असून, या बैठकीला वरिष्ठ नेते पदाधिकारी उपस्थित आहेत, ही बैठक सुमारे 9 तासापर्यंत सुरू राहणार आहे.

दरम्यान, पुणे लोकसभा मतदार संघातून शरद पवार यांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी धरला होता, तसे सूतोवाचही राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केले होते. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होऊ घातली असली, तरी राष्ट्रवादीने पुणे, औरंगाबाद आणि हतकणंगले या मतदार संघांसह राज्यातील 25 जागांवर दावा सांगितला आहे.

Web Title: Sharad Pawar's disclosure about contesting Lok Sabha elections