योगींनी खुशाल राममंदिराची घंटा वाजवावी - शरद यादव

वृत्तसंस्था
बुधवार, 27 जून 2018

आपल्याला राम मंदिराशी श्रद्धा नाही, योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिराची घंटा खुशाल वाजवावी, असे वक्तव्य जनता दल (युनायटेड) चे माजी अध्यक्ष शरद यादव यांनी केले आहे. उत्तर प्रदेशातील राम मंदिराच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी हे वादग्रस्त वक्कव्य केलं आहे.

पटना (बिहार) - आपल्याला राम मंदिराशी श्रद्धा नाही, योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिराची घंटा खुशाल वाजवावी, असे वक्तव्य जनता दल (युनायटेड) चे माजी अध्यक्ष शरद यादव यांनी केले आहे. उत्तर प्रदेशातील राम मंदिराच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी हे वादग्रस्त वक्कव्य केलं आहे.

मला राम मंदिराशी काही देणं घेणं नाही. माझी राम मंदिरावर श्रद्धा नाही. मी फक्त जिवंत व्यक्तीची पूजा करतो, असे शरद यादव यांनी स्पष्ट केले आहे. पुढे बोलताना घंटा वाजवणे हे योगींचे काम आहे त्यांनी ती खुशाल वाजवावी, असेही म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याला शरद यादव यांनी संविधानाचा आधार देत म्हटले आहे की, संविधानात पूजा करण्यासंबंधी काही लिहिलेलं नाही. संविधानात या गोष्टींना काही अर्थ नाही. तर मग आपण का पुजेला महत्वा द्यायचे असेही त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर, त्यांनी महायुतीबाबत बोलताना महायुतीचा विजय निश्तित असल्याचे सांगितले आहे. युतीचे नेतृत्व सगळे मिळून करतील त्यानंतरच पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवला जाईल असे स्पष्ट केले. तसेच, आताचे सरकार हे सर्वच कामामध्ये अपयशी ठरल्याचे सांगत त्यांनी सरकारवर टीका केली.

Web Title: Sharad Yadav Controversy Ram Temple Yogi Adityanath