भाजपशी युतीचा नितीशकुमारांचा निर्णय दुर्दैवी : शरद यादव

वृत्तसंस्था
सोमवार, 31 जुलै 2017

"भाजपशी युतीचा निर्णय मला मान्य नाही. हा एक दुर्दैवी निर्णय आहे. नितीशकुमारांचा हा निर्णय लोकांच्या निवडीविरुद्ध जाणार आहे,'' अशी टोकदार प्रतिक्रिया यादव यांनी व्यक्त केली आहे

नवी दिल्ली - संयुक्त जनता दलाचे (जदयु) नेते व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भारतीय जनता पक्षाशी (भाजप) युती करण्याच्या निर्णयावर पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांनी अंतिमत: मौन सोडले आहे.

"भाजपशी युतीचा निर्णय मला मान्य नाही. हा एक दुर्दैवी निर्णय आहे. नितीशकुमारांचा हा निर्णय लोकांच्या निवडीविरुद्ध जाणार आहे,'' अशी टोकदार प्रतिक्रिया यादव यांनी व्यक्त केली आहे. "ग्रॅंड अलायन्स'मधून बाहेर पडलेल्या नितीशकुमार यांनी बिहारमध्ये भाजपच्या पाठिंब्यावर विश्‍वासदर्शक ठराव जिंकला आहे. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस व भाजपच्या इतर विरोधी राजकीय पक्षांकडून नितीशकुमार यांच्यावर कडवी टीका करण्यात आली आहे. मात्र जदयुचे ज्येष्ठ नेते शरद यादवांची यांची या निर्णयावरील प्रतिक्रिया अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहे.

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नितीश यांच्यावर टीका केली आहे. मात्र बिहारच्या हितासाठीच भारतीय जनता पक्षाशी युती केल्याची भूमिका नितीशकुमार यांनी स्पष्ट केली आहे 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

 

Web Title: sharad yadav unhappy nitishkumar bihar bjp