"एनआयए' महासंचालकपदी शरदकुमार यांना मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली - राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) महासंचालकपदी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी शरदकुमार यांना सलग दुसऱ्यांदा एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

सलग दुसऱ्यादा मुदतवाढ देण्याचा हा निर्णय दुर्मिळ मानला जातो. शरदकुमार हे 1979 च्या तुकडीचे हरियाना केडरचे अधिकारी आहेत. 30 जुलै 2013 रोजी त्यांची "एनआयए'च्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. पठाणकोट हल्ला, काश्‍मीरमधील दहशतवादी हल्ले, समझोता एक्‍स्प्रेस स्फोट, वर्धमान स्फोट अशा संवेदनशील प्रकरणांचा तपास सध्या "एनआयए' करीत आहे. या प्रकरणांचा तपास वेगाने पूर्ण होण्यासाठी शरदकुमार यांच्या नियुक्तीचा लाभ होणार आहे. शरदकुमार यांना त्यांच्या सेवाकाळात 1996 आणि 2004 मध्ये राष्ट्रपती पोलिस पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

Web Title: Sharadkumar Limale is Director General of NIA