शरीफ समर्थक अजिज यांना निवडणुकीस मनाई 

पीटीआय
शुक्रवार, 29 जून 2018

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे कट्टर समर्थक डॅनियल अजिज यांना गुरुवारी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक लढण्यास पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. 
 

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे कट्टर समर्थक डॅनियल अजिज यांना गुरुवारी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक लढण्यास पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. 

तत्कालीन मंत्री अजिज यांना गेल्यावर्षी एका टीव्ही कार्यक्रमात न्यायव्यवस्थेविरुद्ध अवमानकारक मत आणि द्वेषपूर्ण वक्तव्य केल्याप्रकरणी न्यायालयाने नोटीस बजावली होती. न्यायाधीश मुशर यांच्या तीन सदस्यीय पीठाने आज निकाल सुनावला. त्यात अजिज यांना दोषी ठरवत न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, त्यांना पाच वर्षे निवडणूक लढण्यास मनाई केली आहे. त्यामुळे नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लिग पक्षाला धक्का बसला आहे. दरम्यान, अजिज आणि त्यांच्या वकिलांनी न्यायालयात या निकालाविरुद्ध याचिका दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. अजिज हे नरोवाल एनए-77 येथून पाकिस्तानी मुस्लिम लिग- नवाज पक्षाचे उमेदवार होते. 

Web Title: Sharif's loyalist Aziz barred from contesting elections after SC holds him guilty of contempt of court