
Anupam Mittal Wife: बॉलीवूड अभिनेत्रींनाही टशन देते शार्क टँक फेम अनुपम मित्तलची पत्नी
Anupam Mittal Wife : सध्या शार्क टँक २ चांगलाच चर्चेत आहे. शार्क टँकच्या पहिल्या सीजनला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. आता मात्र पुन्हा शार्क टँकचा दुसरा सिजन ट्रेंडवर आहे. या शो सोबतच शोमधील जजेस सुद्धी तितकेच चर्चेत आहे. त्यातील अनुपम मित्तल या जजची चांगलीच क्रेझ प्रेक्षकांमध्ये पहायला दिसते.
आज आपण अनुपम मित्तल आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बरंच काही जाणून घेणार आहोत. (shark tank india judge Anupam Mittal spouse wife Aanchal Kumar love story read story)
कोण आहे अनुपम मित्तल ?
अनुपम मित्तल हा एक उद्योगपती, चित्रपट निर्माता आणि शादी डॉट कॉम, makaan.com आणि पीपल ग्रुपचा फाउंडर आहे तर mouj मोबाईल अॅपचा मालकही आहे. अलीकडे अनुपम शार्क टँक इंडिया या टेलिव्हिजन शोमुळे चांगलाच चर्चेत आला. त्याच्याकडे 185 कोटी रुपयांची एकूण संपत्ती आहे.
अनुपम मित्तलची लव्हस्टोरी
अनुपम मित्तल जितका चर्चेत आहे. तितकीच चर्चेत त्याची पत्नी आंचलसुद्धा आहे. त्याच्या पत्नीचं नाव आंचल असून ती इतकी सुंदर आहे की तिच्यासमोर बॉलिवूड अभिनेत्रीही मागे पडतील. आंचल एक अभिनेत्री असून तिने जाहीराती अन् चित्रपटातही काम केलंय. एवढंच काय तर ती बिगबॉसची स्पर्धकही राहली आहे.
अनुपम आणि आंचल यांच्या लव्ह स्टोरी विषयी सांगायंच झालं तर अनुपम आणि आंचलची पहिली भेट ही एका कॉमन फ्रेंडमुळे झाली होती. त्यानंतर ते जवळपास सात वर्ष एकमेकांना डेट करत होते. २०१३ मध्ये ते दोघे लग्नबंधनात अडकले. त्यांना अलिशा नावाची एक मुलगी आहे.