
ऑपरेशन सिंदूरनंतर भारताचं सर्वपक्षीय शिष्टमंडळ सर्व देशांना भेट देणार आहे. भारतीय ऐक्याचा संदेश जगभरात पोहोचवण्यात येणार आहे. याशिवाय पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघड केला जाणार आहे. या शिष्टमंडळात भाजप नेते रविशंकर प्रसाद, बैजयंत पांडा, काँग्रेसचे शशी थरूर, जेडीयूचे संजय कुमार झा, डीएमकेचे कानिमोझी करुणानिधी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, शिवसेना शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे हे खासदार असणार आहेत.