सर्जिकल स्ट्राईकचा सरकारकडून गाजावाजा - सिन्हा

वृत्तसंस्था
शनिवार, 30 जून 2018

नवी दिल्ली - भाजपचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी सर्जिकल स्ट्राईकचे श्रेय घेणाऱ्या भाजपवर टीका केली आहे. '1971 मध्ये इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे करुन बांगलादेशची निर्मिती केली. तेव्हाही एवढे पोस्टर लागले नव्हते. अटलबिहारी वाजपेयी यांच्याकाळातही सर्जिकल स्ट्राईक करण्यात आली होती, परंतु, आताचे सरकारच त्याचा एवढा गाजावाजा करत आहे.' असे सिन्हा यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर, 'सर्जिकल स्ट्राईक ही तर राष्ट्रहिताची गोष्ट आहे. त्यासाठी लष्कराला सलामच नक्कीच केला पाहिेजे' म्हणून त्याचे श्रेय दुसऱ्यांनी घेऊ नये असेही ते म्हणाले. 'सर्जिकल स्ट्राईकचा एवढा गाजावाजा का केला जात आहे. अशा प्रकारच्या कारवाया यापूर्वीही अनेकवेळा झाल्या आहेत. सर्जिकल स्ट्राइकचं राजकारण का केलं जात आहे?,' असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान, लष्कर आपले काम करत आहे अन् सरकार आपली थोपटून घेत असल्याचा आरोप काँग्रेसने सर्जिकल स्ट्राईकवरून भाजपवर केला होता.

Web Title: shatrughan sinha raises question over releasing surgical strike