Loksabha 2019 : काँग्रेस महंमद अली जिना यांचा पक्ष : शत्रुघ्न सिन्हा

वृत्तसंस्था
शनिवार, 27 एप्रिल 2019

भारताचे स्वातंत्र्य आणि विकासात जिनांसह या सर्वांचे योगदान आहे. यासाठी मी काँग्रेस पक्षात आलो आहे. मी पुन्हा काँग्रेसमधून माघारी जाणार नाही. पक्षापेक्षा देश मोठा असतो, देशापेक्षा मोठे काहीच नसते. नोटाबंदीनंतर जीएसटी लागू करणे हे सर्वांत धोकादायक होते. 

छिंदवाडा : भारताचे स्वातंत्र्य आणि विकासात महंमद अली जिना यांचे मोठे योगदान आहे. काँग्रेस हा महात्मा गांधी यांच्यासह सरदार वल्लभभाई पटेल, जिना, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि राहुल गांधीपर्यंतचा पक्ष असल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी केले आहे.

मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा मुलगा नकुलनाथ यांच्या सभेसाठी शत्रुघ्न सिन्हा आले होते. त्यावेळी त्यांनी महंमद अली जिना यांची स्तुती केली. यावेळी कमलनाथ उपस्थित होते. शत्रुघ्न सिन्हा यांनी नुकताच भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ते बिहारमधील पाटणासाहेब मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, की भारताचे स्वातंत्र्य आणि विकासात जिनांसह या सर्वांचे योगदान आहे. यासाठी मी काँग्रेस पक्षात आलो आहे. मी पुन्हा काँग्रेसमधून माघारी जाणार नाही. पक्षापेक्षा देश मोठा असतो, देशापेक्षा मोठे काहीच नसते. नोटाबंदीनंतर जीएसटी लागू करणे हे सर्वांत धोकादायक होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shatrughan Sinha says Mohammad Ali Jinnah role in india freedom and development