राहुल गांधींकडे परिपक्वतेचा अभाव... नाही!- शीला दीक्षित

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

'पक्षाचे उपाध्यक्ष (राहुल गांधी) हे राजकीयदृष्ट्या परिपक्व नसून, त्यांना आणखी वेळ लागेल,'

- शीला दीक्षित

नवी दिल्ली- काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे 'राजकीय परिपक्वता' कमी आहे, असे वक्तव्य दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी केले. मात्र, त्यावरून राजकीय खळबळ उडाल्यानंतर आपल्या विधानाचा विपर्यास करू नये असे त्या म्हणाल्या. 

माध्यमांतील वृत्तांनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना शीला दीक्षित ट्विटमध्ये म्हणाल्या, "राहुल यांच्याकडे संवेदनशीलता आणि परिपक्व नेत्यासारखी जाणीव आहे. त्यांची भाषा एका तरुण, धैर्यवान आणि अविश्रांत माणसाची आहे."

'पक्षाचे उपाध्यक्ष (राहुल गांधी) हे राजकीयदृष्ट्या परिपक्व नसून, त्यांना आणखी वेळ लागेल,' असे शीला दीक्षित यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान म्हटले होते. आपल्या शब्दांचा वेगळा अर्थ काढला गेला असे स्पष्टीकरण त्यांनी नंतर दिले. 

उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्षासोबत काँग्रेसने आघाडी केल्यानंतर मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून शीला दीक्षित यांनी माघार घेतली. त्यानंतर आपण पक्षाचा प्रचार थांबवल्याचेही त्यांनी सांगितले. 
 

Web Title: Sheila Dikshit downplays 'Rahul Gandhi lacks maturity' remark