आणीबाणीसाठी डायल करा 2016

Shekhar Gupta article
Shekhar Gupta article

भारत 1975-77 मध्ये केलेल्या मोठ्या चुकीची पुनरावृत्ती करीत आहे. परंतु, उघड दिसत असलेला बाह्य शत्रू, भक्कम अर्थव्यवस्था आणि अकार्यक्षम विरोधी पक्ष असल्याने आता धोका मोठा आहे.

आताच्या वेगवेगळ्या इतिहासाच्या काळात राजकीय, वैचारिक आणि बुद्धिवाद्यांनी स्वीकारलेले एक कारण आणीबाणीसाठी निवडणे शक्‍य आहे का? स्वतंत्र भारताच्या इतिहासातील हा एका अंधकारमय काळ होता. जनतेसोबत पत्रकारिता आणि न्यायसंस्था याविरोधात संघर्ष करण्यासाठी उभी राहिली. देवकांत बरुआ यांची "इंदिरा इज इंडिया गांधी' घोषणा अतिशय तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास कारणीभूत ठरली. इंदिरा गांधींचे पुत्र संजय गांधी आणि त्यांच्या स्तुतिपाठकांनी राजधानी दिल्लीला ऐतिहासिक कचराकुंडी बनविले होते.

पंतप्रधानांनी अनेक वेळा आणीबाणी लादण्याची इच्छा दर्शविली आहे. तसेच लोकांच्या स्वातंत्र्यावर गदा येण्याचेही त्यांनी नमूद केले आहे. हाच प्रकार याच आठवड्यात अखेर झाला. प्रसारमाध्यमांच्या इतिहासात आणीबाणीला विरोध करण्यात आघाडीवर असलेले रामनाथ गोएंका यांच्या नावाने उत्कृष्ट पत्रकारितेचे पुरस्कार दिले जातात. या पुरस्कार वितरणावेळी आणीबाणी 40 वर्षांपूर्वी संपली असली तरी एकाधिकारशाही येण्याची शक्‍यता त्यांनी व्यक्त केली. एनडीटीव्ही या हिंदी वृत्तवाहिनीवर पठाणकोट हल्ल्याचे प्रसारण केल्याबद्दल एक दिवसाची बंदी घातल्याच्या पार्श्‍वभूमीवर त्यांचे भाषण महत्त्वाचे आहे.

पंतप्रधानांचे भाषण आणि बंदीचा आदेश हा केवळ योगायोग आहे, ही बाब आपण सध्या गृहित धरू. आणीबाणीच्या काळात व्ही. सी. शुक्‍ला यांनी माध्यमांवर लादलेल्या प्रीसेंसॉरशिपनंतरचा मोठ्या माध्यमाविरुद्धचा हा पहिला आदेश आहे. आणीबाणीतील लढ्याच्या आठवणी भारतीय माध्यमे जागवत असताना हा आदेश आला. हे भारत सरकार असल्यामुळे असे घडू शकते. पंतप्रधान मोदी भाषणातून दक्ष राहण्याची सूचना करीत आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण होणार नाही, असे ठासून सांगत होते. याचवेळी सन्माननीय एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने (ईजीआय) एनडीटीव्हीवरील बंदीचा निषेध करून याची तुलना आणीबाणीशी केली. मी ईजीआयला सन्माननीय म्हणण्यामागे दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे वृत्तपत्र मालकच आता संपादक होऊ लागले आहेत अथवा फारसे प्रसिद्ध नसलेले संपादक नेमू लागले आहेत. यातील बहुतांश वयाने ज्येष्ठ व जुन्या परंपरेतील आहेत. त्यांना संकेतस्थळ तयार करण्यापासून ट्विटर हॅंडलही तयार करता येत नाही. दुसरे कारण म्हणजे ईजीआयने निषेध करण्यासाठी याआधी वापरलेली भाषाही जुन्या परंपरेतील, संयमित आणि मोजूनमापून नाही. आताची भाषा तिखटमीठ लावलेली आणि दारूगोळ्यात पॅकबंद केलेली आहे.

आपण पत्रकार आहोत म्हणून आणीबाणी केवळ मुस्कटदाबी आणि त्याला केलेला विरोध यापुरती मर्यादित ठेवतो. आता याला आणखी एक इतिहास आहे. लालकृष्ण अडवानी यांचे विधान होते, की भारतीय माध्यमांना वाकण्यास सांगितले तरी ती सरपटत चालू लागली. खेदजनक वास्तव असे आहे, की भारतीय माध्यमे कोणाताही लढा देण्यास असमर्थ ठरली. यात एक्‍स्प्रेसचे गोएंका, इराणींचे स्टेटसमन आणि या सर्वांत धाडसी नियतकालिक म्हणजे राजमोहन गांधी यांचे हिम्मत अपवाद ठरले. इंदिरा गांधी यांनी भारतीय माध्यमांची तागाची माध्यमे अशी अवहेलना केली होती. कारण काही मालक हे तागाचे व्यापारी होते. त्यानंतर "झूट माध्यमे' अशी संभावनाही त्यांनी केली. बांगलादेश युद्धातील विजयानंतरचे वलय महागाई 25 टक्‍क्‍यांवर गेल्याने कमी झाले. त्याचा राग त्यांनी माध्यमांवर काढला. त्यानंतर पोखरणच्या 1974 च्या स्फोटानेही परिस्थिती बदलली नाही. आणीबाणीतील महत्त्वाचे संपादक म्हणून बी. जी. वर्गीस यांचे नाव घ्यावे लागेल. मात्र, त्यांची काही काळातच उचलबांगडी झाली.

सिक्कीमच्या विलीनीकरणाला त्यांनी ताब्यात घेण्याची उपमा दिली. यामुळे त्यांना देशविरोधी ठरविण्यात आले. या वेळी वर्गीस यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना मदत केली नाही. एनडीटीव्हीच्या मुद्द्यावर आता आपल्याला माध्यमांमध्ये परिस्थितीला बगल देणारे वातावरण दिसते. ईजीआय आणि वृत्तपत्रे विरोधी भूमिका घेत असताना महत्त्वाच्या वाहिन्या मात्र देशहिताचा मुद्दा घेऊन विरोध करताना दिसत नाहीत. टीआरपीसाठीच्या अतिराष्ट्रवादातून अनेकांनी भोपाळमधील चकमकीची बातमी टाळली. खरेतर हे थंड डोक्‍याने केलेले खून आहेत. याचप्रकारची राष्ट्रवादाची संकल्पना, उरी हल्ल्याबाबतचे तपशील आणि त्यानंतरची परिस्थिती यांचा वापर सरकार वेळोवेळी करीत आहे. नियंत्रण रेषेवरील सामान्य माणसाच्या जीवनावरील परिणामाचे वार्तांकन हे पक्षपाती असून, सिमला करारावेळीच्या वार्तांकनापेक्षाही वाईट आहे. याचे श्रेय मोदी सरकारला आहे. मोदी -डोवाल यांच्या राजवटीत बदल झाले आहेत. देशहिताबद्दल चर्चा करणे तर दूर, तुम्ही प्रश्‍नही विचारू शकत नाही. जनतेला यातील काही नको असून, त्यांना केवळ टाळ्या पिटायच्या आहेत.

इंदिरा गांधी यांनी अतिराष्ट्रवादाचा वापर आणीबाणीसाठी केला. शेजारील देशात झालेली मुजीबूर रेहमान आणि दूरच्या चिलीमध्ये साल्वाडोर अलेंदे यांची झालेली हत्या यांच्याप्रमाणेच जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीत परकी हात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. भारताने पाकिस्तानवर मिळविलेला लष्करी विजय, विस्कळित पाकिस्तान आणि मोडून पडलेली नक्षलवादी चळवळ, तसेच देशांतर्गत धोका सध्या कमी आहे. त्यामुळेच आता राष्ट्रवादाचे वातावरण निर्माण केले जात आहे.

भारताने चार वर्षांपूर्वी फॅसिस्ट विचारांना थारा दिला असता का? आणीबाणीचा विचार करता त्यावेळी सक्तीने नसबंदीची मोहीम सुरू होईपर्यंत मध्यम वर्गाला काही स्वातंत्र्यांना तिलांजली देण्याची हरकत नव्हती. यातूनच इंदिरा गांधी यांचा 1997 च्या निवडणुकीत पराभव झाला. असे म्हणायला हरकत नाही की उच्चभ्रू आणि मध्यम वर्गाला स्वातंत्र्याची फिकीर नसते. ते केवळ व्यापारी विचार करून याची मला काय किंमत मोजायला लागेल हे पाहतात. हा निकष धरता 40 वर्षांत आपण फारसे बदललो नाही. आता तर धोके अधिक आहेत. परकी शत्रू समोर स्पष्टपणे दिसत आहे. अर्थव्यवस्थेची स्थिती चांगली असल्याने जनतेत नाराजी नाही, आणि सामाजिक-राजकीय शक्ती मूलभूत तत्त्वांवरील विश्‍वास गमावून टीआरपी आणि जनमतानुसार मार्गक्रमण करीत आहेत. आजच्या घडीला स्पष्ट विचार असलेली आणि सर्वांना एकत्र ठेवणारी संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. त्यावेळी ती आणीबाणीविरोधात लढत होती आता ती व्यवस्थेचे नेतृत्व करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com