तीन अंड्यांसाठी भरले १,६७२...

वृत्तसंस्था
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

अनेक प्रसिद्ध कलाकार पंचतारांकित हॉटेलमध्येच उतरतात. येथील महागड्या दरांची त्यांना कल्पना असली तरी छोट्या गोष्टींसाठी इतके पैसे देताना त्यांनाही धक्का बसतो. गायक शेखरने अहमदाबादमधील एका प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलमध्ये जात तीन उकडलेली अंडी मागविली. अंडी खाल्ल्यानंतर आलेले बिल पाहताच त्याला धक्का बसला. आश्‍चर्यचकित झालेल्या शेखरने या बिलाचा फोटो ट्‌विटरवर प्रसिद्ध केला. त्याच्या या ट्‌विटवर अनेकांनी प्रतिक्रिया देत पंचतारांकित हॉटेलमधील महागड्या जेवणावर टीका केली.

अहमदाबाद - प्रसिद्ध गायक-संगीतकार शेखर रावजिआनी याला येथील एका आलिशान हॉटेलने तीन उकडलेल्या अंड्यांसाठी तब्बल १,६७२ रुपयांचे बिल दिले. 

अनेक प्रसिद्ध कलाकार पंचतारांकित हॉटेलमध्येच उतरतात. येथील महागड्या दरांची त्यांना कल्पना असली तरी छोट्या गोष्टींसाठी इतके पैसे देताना त्यांनाही धक्का बसतो. गायक शेखरने अहमदाबादमधील एका प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलमध्ये जात तीन उकडलेली अंडी मागविली. अंडी खाल्ल्यानंतर आलेले बिल पाहताच त्याला धक्का बसला. आश्‍चर्यचकित झालेल्या शेखरने या बिलाचा फोटो ट्‌विटरवर प्रसिद्ध केला. त्याच्या या ट्‌विटवर अनेकांनी प्रतिक्रिया देत पंचतारांकित हॉटेलमधील महागड्या जेवणावर टीका केली. 

या बिलाच्या किमतीत ‘जेएनयू’मधील एक विद्यार्थी १५ वर्षांचे वसतिगृहाच्या खोलीचे भाडे भरू शकेल, अशी प्रतिक्रिया एका नेटिझनने दिली. तर केवळ ही तीन अंडी देण्यासाठी कोंबडी दुसऱ्या देशातून इथे प्रवास करून आली होती, असा टोमणाही एकाने मारला आहे. काही महिन्यांपूर्वी अभिनेता राहुल बोस यालाही चंदीगडमधील एका पंचतारांकित हॉटेलने दोन केळ्यांसाठी साडेचारशे रुपयांचे बिल दिले होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shekhar ravjiani egg 1672 rupees hotel