#शिक्षकभरती हा राज्यांचा विषय - जावडेकर

बुधवार, 1 ऑगस्ट 2018

शिक्षक भरती हा राज्यांचा विषय आहे. आम्ही त्यांना पैसे देऊन शिक्षकभरती करण्याचे सांगत असतो. शिक्षक भरती राज्यांचे काम आहे आणि त्यांनी ते करायला हवे, असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले आहे. केंद्र सरकारने गेल्या चार वर्षांत केलेल्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी ई-सकाळच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ते बोलत होते. 

नवी दिल्ली- शिक्षक भरती हा राज्यांचा विषय आहे. आम्ही त्यांना पैसे देऊन शिक्षकभरती करण्याचे सांगत असतो. शिक्षक भरती राज्यांचे काम आहे आणि त्यांनी ते करायला हवे, असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले आहे. केंद्र सरकारने गेल्या चार वर्षांत केलेल्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी ई-सकाळच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ते बोलत होते. 

जावडेकर म्हणाले की, 'सरकारी शाळाची गुणवत्ता वाढावी यासाठी मोठ्या प्रमाणावर सरकारने प्रयत्न केले आहेत. शिक्षणाला खऱ्या अर्थाने आता नवी चालना मिळाली आहे. मोदी सरकारच्या काळात संबध राजकारणातला भ्रष्टाचार नष्ट झाला. भ्रष्टाचाराच्या सगळ्या शक्यता मोदी सरकारने संपवल्या आहेत. काँग्रेसच्या काळात 100 रुपयांपैकी 15 रुपयेच लोकांपर्यंत पोहचायचे. परंतु, मोदी सरकारच्या काळात 100 पैकी 100 रुपये लोकांपर्यंत ते पोहचत आहेत. याला, आधारची जोडणी मिळाल्यामुळे सगळे खोटे व्यवहार बंद झाले. शेतकऱ्यांनाही मोदी सरकारचा मोठा फायदा झाला. सगळ्या गोष्टींमध्ये भारताचे जगातले स्थान वाढले. तेजीने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताची अर्थव्यवस्था समोर आली आहे. नितीन गडकरी यांनी रस्त्याचे जाळे विणले. मुद्रा योजनेचा लाभ लोकांना व्यवसाय करण्यासाठी झाला आहे. यातून रोजगारनिर्मीती मोठ्या प्रमाणात झाली आहे. हे सगळे मोदींच्या दूरदृष्टीमुळे झाले.

त्याचबरोबर, नोटाबंदीचे लोकांनी स्वागत केले. नोटाबंदीचा निर्णय लोकांनी शांतपणे स्विकारला. जीएसटीनेही सगळी संकटे पार करत, आता तीही रुळली आहे. केंद्राने महाराष्ट्रासाठी खुप मोठे मोठे निर्णय घेतले आहेत. जी कामे 15 वर्षापासून रखडून पडली होती, ती कामे पाठीमागील 4 वर्षात पूर्ण झाली आहेत. केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. मेट्रोचाही भविष्यकाळात मोठ्या प्रमाणात विस्तार होईल. पुढच्या 4-5 वर्षात लोकांना मेट्रोचा चांगला फायदा होईल, असे जावडेकर यांनी सांगितले.

Web Title: shikshakbharati Teacher recruitment is the subject of the states says jawdekar