हिमाचल प्रदेशात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017

शिमला : हिमाचल प्रदेशच्या उंचीवरील भागात आज मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली, तर राज्याच्या अन्य भागात हवामान कोरडे राहील, असे अधिकाऱ्यांनी आज स्पष्ट केले. 13 हजार 50 फूट उंचीवर असलेल्या रोहतांग पास येथील रस्ता निसरडा झाला असल्याने वाहनचालकांनी दिवसाच येथून प्रवास करावा, अशा सूचना लहूल आणि स्पीटीच्या प्रशासनाने दिल्या आहेत. या मार्गावरून जाणाऱ्या बसेसही बंद करण्यात आल्या आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

उना, अम्ब आणि नगरोटा हे सोडून मध्य, निम्न आणि डोंगराळ भागात हवामान कोरडे होते. दरम्यान, राज्याच्या अन्य भागात थंड वारे वाहत होते. उंचीवरील डोंगराळ भागात पारा गोठणबिंदूच्या खाली गेला होता. काल्पा आणि केलॉंग येथे उणे 0.2 अंश ते उणे 0.5 अंश तापमानाची नोंद झाली. त्याशिवाय मनाली, सोलन आणि शिमला येथे अनुक्रमे 3.2 अंश,5.3 अंश आणि 5.7 अंश तापमान नोंदविले गेले. भूंतर, सुंदरनगर,धर्मशाळा आणि पालमपूर येथेही हवामान थंड होते. तेथे अनुक्रमे 6.5 अंश, सात अंश, 8.2 आणि 8.5 अंश तापमान नोंदविले गेले. दाट धुक्‍यामुळे येथील वाहतुकीला अडथळा उत्पन्न झाला होता त्याचप्रमाणे शहरातील वातावरणही खूपच खराब होते. दुपारपर्यंत येथे सूर्यदर्शन झाले नाही.

Web Title: shimla news himachal pradesh snowfall